Pune : वाढदिवसाला दुबईला नेलं नाही, पुण्यातल्या बिल्डरला पत्नीने एका बुक्क्यात संपवलं
- Published by:Shreyas
Last Updated:
वाढदिवसाला दुबईला का नेलं नाही, म्हणून पत्नीने पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 24 नोव्हेंबर : वाढदिवसाला दुबईला का नेलं नाही, म्हणून पत्नीने पतीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार पुण्यात घडला आहे. दुबईला नेलं नाही, वाढदिवसाला मनासारखं गिफ्ट दिलं नाही म्हणून पती-पत्नी यांच्यात भांडण झालं, यानंतर पत्नीने पतीला मारहाण केली. या मारहाणीत 36 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिक पतीचा मृत्यू झाला आहे.
पुण्याच्या वानवडी परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादात पतीच्या तोंडावर ठोसा मारला. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान वानवडी इथल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. निखील पुष्पराज खन्ना (वय 36) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. निखील खन्ना हे बांधकाम व्यावसायिक होते. या प्रकरणी रेणुका खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलं आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2023 7:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : वाढदिवसाला दुबईला नेलं नाही, पुण्यातल्या बिल्डरला पत्नीने एका बुक्क्यात संपवलं