crime : पत्नीला बॉयफ्रेंडसोबत घरात पकडलं अन् दोघांनी मिळून नवऱ्यालाच धुतलं, आणि...

Last Updated:

या ठिकाणी पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून पतीवर जीवघेणा हल्ला केला. मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय, असं समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
नोएडा, 21 नोव्हेंबर : पती आणि पत्नीच्या नात्यात लहान लहान कारणांवरून वाद होत असतात. अनेकदा वाद विकोपाला जातात आणि गुन्हेगारी कृत्य घडतं. बऱ्याचदा पती किंवा पत्नीचं अफेअर असणं, अफेअरचा संशय असणं अशा गोष्टी याला कारणीभूत असतात. आता अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीने कथित बॉयफ्रेंडसोबत मिळून पतीला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
ही घटना राजधानी दिल्लीजवळच्या नोएडातली आहे. या ठिकाणी पत्नीने तिच्या प्रियकरासह मिळून पतीवर जीवघेणा हल्ला केला. मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय, असं समजून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. आसपासच्या नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर पीडित पतीच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या संदर्भातलं वृत्त 'इंडिया टीव्ही'ने दिलं आहे.
advertisement
सेक्टर-24 पोलीस स्टेशन हद्दीतल्या मोरना गावात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत मिळून तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला. घटनेबद्दल गुन्हा दाखल करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सेक्टर-24 पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अमित कुमार यांनी सांगितलं, की मोरना गावातले रहिवासी छोटा बाबू रावत यांनी सोमवारी (20 नोव्हेंबर) रात्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
advertisement
त्यांच्या तक्रारीनुसार, संध्याकाळी ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांनी टिकेंद्र सिंह चौहानला आपल्या घरी पाहिलं. टिकेंद्र हा चौडा गावचा रहिवासी आहे. त्यांनी पत्नी दुर्गाला विचारलं, की टिकेंद्र घरी का आला आहे. त्यावर ती संतापली आणि त्याच्याशी भांडू लागली. पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले, की पीडित पतीने तिला विरोध केला असता दुर्गा आणि टिकेंद्र यांनी घरात असलेल्या लोखंडी रॉडने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती गंभीर जखमी झाला.
advertisement
पीडित पती बेशुद्ध पडल्यावर दोघांनीही त्याला मृत समजून तेथून पळ काढला. जवळच्या नागरिकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रावत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पीडित छोटा बाबू रावत यांच्या तक्रारीवरून टिकेंद्र सिंह चौहान आणि दुर्गा रावत यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
crime : पत्नीला बॉयफ्रेंडसोबत घरात पकडलं अन् दोघांनी मिळून नवऱ्यालाच धुतलं, आणि...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement