advertisement

पुणे सोलापूर महामार्गावर थरार! महिलेला पुण्यासाठी लिफ्ट दिली; कारमध्ये बसताच बंदुक काढली अन् हादरवणारं कृत्य

Last Updated:

पुण्याला जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका महिलेला गाडीत बसवून तिच्यासोबत धक्कादायक कृत्य करण्यात आलं. या महिलेला निर्जनस्थळी नेऊन बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

गाडीत बसवून महिलेवर अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)
गाडीत बसवून महिलेवर अत्याचार (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याला जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका महिलेला गाडीत बसवून तिच्यासोबत धक्कादायक कृत्य करण्यात आलं. या महिलेला निर्जनस्थळी नेऊन बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी अमोल साहेबराव काळे (रा. खडकी, ता. दौंड) याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या आपल्या आईला भेटण्यासाठी निघाली होती. भिगवण येथून एका पिकअप गाडीने ती कुरकुंभपर्यंत पोहोचली. तिथून पुढे पुण्याला जाण्यासाठी ती भराव पुलाजवळ वाहनाची वाट पाहत उभी होती. यावेळी आरोपी अमोल काळे हा आपल्या (MH 42 BN 7755) क्रमांकाच्या वाहनातून तिथे आला. "मी पण पुण्यालाच चाललो आहे, तुम्हाला सोडतो," असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिला गाडीत बसवले. मात्र, पुढे जे घडणार होते, त्याची या महिलेला कल्पनाही नव्हती.
advertisement
बंदुकीचा धाक आणि अत्याचार
गाडी काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपीने आपले खरे रूप दाखवले. त्याने गाडी निर्जन ठिकाणी नेली आणि महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नाही तर, या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. पीडितेने या धक्क्यातून सावरत दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
advertisement
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासचक्र फिरवले आणि आरोपीला अटक केली. महामार्गावर एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे सोलापूर महामार्गावर थरार! महिलेला पुण्यासाठी लिफ्ट दिली; कारमध्ये बसताच बंदुक काढली अन् हादरवणारं कृत्य
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement