advertisement

Mumbai-Alibaug : फेरीबोटची गरज नाही! मुंबईहून कारने फक्त दीड तासात अलिबाग गाठणे शक्य; जाणून घ्या कसे?

Last Updated:

Atal Setu Mumbai to Alibaug direct route : मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता मुंबईहून अलिबाग आता अत्यंत कमी वेळात पार करता येणार आहे. प्रवासाचा हा वेळ कसा कमी होणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या.

आता कारने अवघ्या दीड तासात अलिबाग गाठणे शक्य
आता कारने अवघ्या दीड तासात अलिबाग गाठणे शक्य
नवी मुंबई : अनेक वर्षांवापासून स्वप्न असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न अखेर पूर्ण झाल्यानंतर सिडकोने आता या भागातील दळणवळ अधिक सक्षम करण्यावर भर दिलेली आहे. त्यानुसार आता मुंबई-नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या अटल सेतूला थेट विमानतळ,जेएनपीए आणि थेट अलिबागला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.
अलिबागला जाणं आता झालं अधिक सोपं
या प्रकल्पाचा भाग म्हणून उलवे कोस्टल रोडचा विस्तार करुन तो मार्ग रेवज-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचाही प्रस्ताव पुढे आला असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-अलिबाग हा प्रवास केवळ दीड तासांत करता येणार आहे.
असा असेल नवा मार्ग
या मार्गाच्या विस्तारामुळे अटले सेतू ते द्रोणागिरीमार्गे करजां-रेवस पुलापर्यंत अखंड असा कोस्टल कॉरिडॉर उभा राहणार आहे. शिवाय नवी मुंबई, नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि कोकण कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल.
advertisement
सहा-लेन कोस्टल रोडमुळे प्रवाशांना दिलासा
अटल सेतू ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा 7 कि.मी लांबीचा असा 6लेन उलवे कोस्टल रोड सध्या उभारला जात आहे आणि याच मार्गाचा पुढचा टप्पा म्हणून द्रोणागिरीमार्गे करंजा खाडी पुलापर्यंत विस्तार करण्याचा सिडकोचा मानस आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Alibaug : फेरीबोटची गरज नाही! मुंबईहून कारने फक्त दीड तासात अलिबाग गाठणे शक्य; जाणून घ्या कसे?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement