500 वर्षांची परंपरा! 'या' गावात होते वटवाघळांची पूजा, कारण ऐकाल तर चकित व्हाल!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
'बदूर छपरा' हे गाव देशभरात अनोख्या श्रद्धेमुळे प्रसिद्ध आहे. येथे वटवाघळांना देवतेप्रमाणे मान दिला जातो. गावकऱ्यांचा विश्वास आहे की वटवाघळांना त्रास दिल्यास...
बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात एक अनोखं गाव आहे. इथे वटवाघळांची (बदूर) पूजा केली जाते. त्यांना गावाचे रक्षकही मानले जाते. या गावाचे नाव छपरा आहे, पण आता लोक त्याला 'बदूर छपरा' म्हणूनच ओळखतात. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, जर एखाद्या व्यक्तीने या वटवाघळांना त्रास दिला किंवा त्यांची शिकार केली, तर संपूर्ण गावावर संकट येते. असं मानलं जातं की, जो असं करतो, त्याच्या घरात आजारपण, भांडणं आणि आर्थिक नुकसान होतं.
ही परंपरा शेकडो वर्षांची जुनी
गावातील वडीलधाऱ्या मंडळींच्या म्हणण्यानुसार, या परंपरेची मुळे सुमारे 500-600 वर्षांपूर्वीची आहेत. असं म्हणतात की, मेघ राय नावाच्या व्यक्तीने हे गाव वसवले होते. त्यांना चार मुलगे होते. हळूहळू त्यांचा वंश वाढत गेला. आज त्यांची शंभरहून अधिक पिढ्या इथे राहतात. गावात वटवाघळांचे वास्तव्यही तितकेच जुने मानले जाते.
एका घटनेमुळे विश्वासाला मिळाली चालना
असं सांगितलं जातं की, सुमारे 250 वर्षांपूर्वी गावात कोणीतरी वटवाघळांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हाकलून लावले. यानंतर गावात दुष्काळ पडला, लोक आजारी पडू लागले आणि सगळीकडे संकटच संकट आलं. मग गावातील लोकांनी पंडितांकडून पूजा करवून घेतली. वटवाघळे ज्या भागात गेली होती, तिथे जाऊन त्यांनी प्रार्थना केली. पूजा आणि विनंती केल्यानंतर वटवाघळे गावात परतली. तेव्हापासून गावकऱ्यांनी त्यांना 'देवाचा' दर्जा दिला आहे आणि आजपर्यंत त्यांची पूजा करतात.
advertisement
हे अनोखे नाते आजही कायम
आज या गावात सुमारे 40 ते 50 हजार वटवाघळे राहतात. ती दिवसभर झाडांवर आराम करतात आणि संध्याकाळी अन्नाच्या शोधात उडून जातात. सकाळी पुन्हा परत येतात. गावातील लोक त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देत नाहीत. लोक त्यांना सुरक्षितपणे आणि आदराने राहू देतात. इतक्या मोठ्या संख्येने वटवाघळे आणि गावकऱ्यांचे त्यांच्याशी असलेले सखोल नाते पाहण्यासाठी दूरदूरून लोक या गावात येतात. अनेक पर्यटक आणि संशोधकही या गावातील परंपरा पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी इथे येतात.
advertisement
हे ही वाचा : तुमचेही हात-पाय सतत बधीर होतात? तर 'या' गोष्टीची आहे कमतरता; आत्ताच लक्ष द्या नाहीतर...
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
500 वर्षांची परंपरा! 'या' गावात होते वटवाघळांची पूजा, कारण ऐकाल तर चकित व्हाल!