राहूने नक्षत्र परिवर्तन करताच तीन राशींचं उजळणार नशीब; धनलाभासह प्रगतीचे योग; करिअरमध्ये मिळणार मोठं यश
- Published by:Prachi Dhole
- trending desk
Last Updated:
राहूचं नक्षत्र परिवर्तन अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करील; पण तीन राशींसाठी राहूचं नक्षत्र परिवर्तन खास असेल.
ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे पापग्रह मानले गेले आहेत. हे दोन्ही ग्रह एकाच वेळी राशिपरिवर्तन करतात. सध्या राहू गुरूच्या मीन राशीत, तर केतू बुधाच्या कन्या राशीत गोचर करत आहे. पुढच्या वर्षी 2025मध्ये राहू नक्षत्र परिवर्तन करत आहे. राहू पूर्वा भाद्रपदा या गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करील. राहूचं नक्षत्र परिवर्तन अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करील; पण तीन राशींसाठी राहूचं नक्षत्र परिवर्तन खास असेल.
Golden Baba: 23 किलो सोने, 27 लाखांचे घड्याळ; हे 'गोल्डन बाबा' कोण होते?
राहू हा छायाग्रह आणि पापग्रह मानला जातो. राहूचं गोचर मानवी जीवनावर मोठा परिणाम करतं. मार्च 2025मध्ये राहू राशिपरिवर्तन करत आहे. त्यापूर्वी तो वर्षाच्या सुरुवातीला नक्षत्र परिवर्तन करील. राहू आणि केतू हे नेहमी वक्री असतात. ते एकाच दिवशी राशिपरिवर्तन करतात. 16 मार्च 2025 रोजी सायंकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी राहू पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करत आहे. राहूच्या या परिवर्तनाचा सर्व राशींवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम दिसेल. त्यात वृषभ, मिथुन आणि तूळ या तीन राशींसाठी हे परिवर्तन अनुकूल असेल. या राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
advertisement
वृषभ : या राशीच्या व्यक्तींना राहूचं गोचर विशेष लाभदायक असेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थितीत मोठा बदल होऊ शकतो. परदेश प्रवासाचे योग आहेत. नवीन मालमत्ता खरेदी कराल. जीवनात आनंद येईल.
मिथुन : पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातलं राहूचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक असेल. तुम्ही करिअरकडे लक्ष दिलं तर चांगलं यश मिळेल. नवीन नोकरीचा शोध संपेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. कुटुंबासोबत चांगले क्षण व्यतीत कराल.
advertisement
तूळ : या राशीच्या व्यक्तींना लॉटरी लागू शकते. करिअरमध्ये मोठं यश मिळू शकतं. एकामागून एक नवीन संधी मिळतील. प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल. जीवनातल्या समस्या दूर होतील. तुम्हाला साहसी वृत्ती आणि ताकद जाणवेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2024 8:30 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
राहूने नक्षत्र परिवर्तन करताच तीन राशींचं उजळणार नशीब; धनलाभासह प्रगतीचे योग; करिअरमध्ये मिळणार मोठं यश