advertisement

विड्याच्या पानाला पूजेत इतकं महत्त्व का? तुम्हाला माहितीय का Interesting fact

Last Updated:

धार्मिक कार्यांमध्ये विड्याच्या पानाचा वापर कसा सुरू झाला, त्यांची उत्पत्ती कशी झाली व त्याचे फायदे कोणकोणते आहेत, हे जाणून घेऊया.

वि़डा
वि़डा
मुंबई : भारतीय संस्कृतीत धार्मिक कार्यांना फार महत्त्व आहे. पूजा, प्रथा-परंपरा, सणावेळी विड्याचं पान वापरतात. इतकंच नाही तर आहारातही विड्याचं पान गुणकारी समजलं जातं. धार्मिक कार्यांमध्ये विड्याच्या पानाचा वापर कसा सुरू झाला, त्यांची उत्पत्ती कशी झाली व त्याचे फायदे कोणकोणते आहेत, हे जाणून घेऊया.
धार्मिक कार्य, पूजा, बारसं, लग्न हे सोहळे अशा प्रत्येकवेळी विड्याचं पान वापरलं जातं. हे पान देवी-देवतांना भोजनोत्तर अर्पण केलं जातं, असं पंडित सुजीत जी महाराज यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, विड्याची पानं शुभ समजली जातात. ती वापरल्यानं देवी-देवता प्रसन्न होतात.
पानांमध्ये असलेले गुण उपासकाला देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून देतात. तसंच हिंदू धर्मानुसार, विड्याच्या पानाला ब्रह्मा, विष्णू, महेशाचं प्रतीक समजलं गेलंय. पूजा किंवा इतर कार्य़ांमध्ये विड्याच्या पानावर सुपारी व अक्षता ठेवल्या जातात. काही ठिकाणी कापूर ठेवून प्रज्ज्वलित केला जातो. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
advertisement
विड्याच्या पानाला संस्कृतमध्ये तांबूल, तेलुगूमध्ये पक्कू, तमिळमध्ये वेटिलाई, मराठीत नागवेलीचं पान, गुजरातीमध्ये नागूरवेल असं म्हटलं जातं. पंडित सुजीत जी महाराज यांच्या मते, लग्नानंतर वरात घरी आली की मुलीकडे मुलाकडच्यांना पान खाऊ घालतात. काही ठिकाणी लग्नात नवऱ्याला पान खायला देतात. यामुळे वैवाहिक जीवनात लक्ष्मी देवीची कृपा लाभते असं मानतात. कारण पानाच्या मधल्या भागावर लक्ष्मीदेवीचा वास असतो अशी मान्यता आहे.
advertisement
भारतीय संस्कृतीत विड्याच्या पानाचे उल्लेख रामायण व महाभारतातही सापडतात. हनुमान श्रीरामांचा संदेश घेऊन सीतामातेकडे गेले, तेव्हा सीतामाई प्रसन्न झाल्या व त्यांनी हनुमानाला विड्याच्या पानांची माळ भेट दिली. महाभारत युद्धानंतर यज्ञासाठी ही पानं शोधण्यासाठी अर्जुनाला नागलोकात जावं लागलं होतं,असे उल्लेख आढळतात.
पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर व पार्वती मातेनं हिमालयातील एका डोंगरावर विड्याच्या पानाचा वेल पहिल्यांदा लावला. तेव्हापासून ही पानं पवित्र समजली जातात. पानाच्या उत्पत्तीची कथा समुद्रमंथनाशीदेखील निगडीत आहे. समुद्रमंथनावेळी धन्वंतरी देवता अमृतकुंभ घेऊन निघाले.
advertisement
देवतांनी तो कलश नंदनवनात ठेवला. त्याच्या शेजारीच मंथनातून निघालेल्या ऐरावत हत्तीला बांधण्यासाठीचा खांबही होता. तो ऐरावत अमृताचा सुगंध घेत होता. एके दिवशी त्या कलशातून एक दिव्य वेल निर्माण झाला. तो त्या ऐरावतासमोरच्या खांबावर चढला. सगळ्यात आधी ऐरावतानं त्या वेलाची पानं खाल्ली. त्या वेलाच्या सुगंधानं देवी देवताही प्रफुल्लीत झाले व त्यांनी मुखशुद्धीसाठी पानांचं सेवन केलं. धन्वंतरी देवांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं, की ही पानं पुढे नागवल्ली म्हणून प्रसिद्ध होतील.
advertisement
पंडित सुजीत जी महाराज यांच्या मते, आयुष्यातल्या अनेक संकटांवर मात करण्यासाठीही विड्याच्या पानांचे उपाय करता येऊ शकतात. पानात कात घालून ते खाल्लं तर यकृताचं आरोग्य चांगलं राहतं. एखादं काम होत नसेल, तर विड्याची 21 पानं घेऊन प्रत्येक पानावर राम लिहा व त्याची माळ बनवून मंगळवारी हनुमानाला अर्पण करा. यामुळे कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक समस्या असेल तर पानात कात घालून त्यावर लवंग लावून हनुमानाला अर्पण करा. यामुळे धनधान्यात वृद्धी होते.
advertisement
विड्याची पानं आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर आहेत. ती पाचक असतात. तसंच या पानांना धार्मिक महत्त्वही आहे. भारतीय संस्कृतीत म्हणून विड्याची पानं महत्त्वाची समजली जातात.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
विड्याच्या पानाला पूजेत इतकं महत्त्व का? तुम्हाला माहितीय का Interesting fact
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement