advertisement

Surya Grahan 2024: ग्रहणाची काळीकुट्ट छाया! उद्या खग्रास सूर्यग्रहण संपल्याबरोबर या गोष्टी करून घ्या

Last Updated:

Surya Grahan 2024: सूर्यग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी सूर्यग्रहणानंतर घर आणि देव्हाऱ्याशी संबंधित कोणते नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.

News18
News18
मुंबई : सूर्य-चंद्राला ग्रहण लागणं ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला मोठं महत्त्व आहे. भारतात ग्रहण शुभ आणि अशुभ, धर्म आणि चालीरीती यातून पाहिलं जातं. सूतक कालावधी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होण्याच्या 9 तास आधी मानला जातो. त्या काळात काही गोष्टी करू नयेत असे मानले जाते. यंदा 08 एप्रिल रोजी वर्षातील पहिले खग्रास सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सूतक कालावधीही वैध नाही. सर्वसाधारण ग्रहणकाळात काही नियम सांगितले जातात, काही नियम ग्रहण संपल्यानंतरही पाळले जातात.
सूर्यग्रहण संपल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ज्योतिषी आणि वास्तु तज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांनी सूर्यग्रहणानंतर घर आणि देव्हाऱ्याशी संबंधित कोणते नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे, याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊ.
ग्रहण संपल्यानंतर गंगाजलाचा उपाय - सूतक संपल्यानंतर लगेचच घरातील देव्हाऱ्यात गंगाजल शिंपडावे. इतकंच नाही तर देव्हाऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी गंगाजल शिंपडून स्वतःची शुद्धी करणेही अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गंगाजल शुद्ध असते आणि त्यावर कोणत्याही प्रकारच्या ग्रहणाचा प्रभाव पडत नाही, त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव दूर करण्यासाठी घराच्या प्रत्येक काना-कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे.
advertisement
देव्हाऱ्यातील देवतांना स्नान - ग्रहणाचा कालावधी संपल्यानंतर देव्हाऱ्यातील प्रत्येक मूर्ती आणि फोटो स्वच्छ करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही लिंबू, दही, चंदन वापरू शकता. देव्हाऱ्यातील मूर्तींना कपडे घातले असतील तर ते बदलण्याची गरज आहे. सूतक काळात देवाला घातलेले कपडे पुन्हा देवाला घालू नयेत.
advertisement
मंदिरातील भांड्यांची साफसफाई -
देवाची पूजा करता जी भांडी आपण वापरतो किंवा देव्हाऱ्यात ठेवलेली भांडी स्वच्छ करावीत. याशिवाय ग्रहण संपल्यानंतर मंदिर-देव्हाऱ्यांमध्ये ठेवलेला कलश, घंटा, गदा, त्रिशूळ, शंख इत्यादींची स्वच्छता करणे गरजेचे आहे. सूतक काळाच्या वेळी देव्हारा झाकण्यासाठी वापरलेले कापड देखील काढून टाकावे आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. तेथे नवीन कापड लावण्याची परंपरा आहे.
advertisement
ते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Surya Grahan 2024: ग्रहणाची काळीकुट्ट छाया! उद्या खग्रास सूर्यग्रहण संपल्याबरोबर या गोष्टी करून घ्या
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement