Weekly Rashi Bhavishya In Marathi: या राशींना आठवडा अतिशय शुभ! आर्थिक लाभ, आवडीची सहल घडणार; साप्ताहिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Saptahik Rashibhavishy In Marathi: येणारा आठवडा कसा असेल, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2024 या आठवड्यासाठीचं राशिभविष्य..
मेष (Aries): मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. पण, या काळात कामामुळे तुम्ही स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. योग्य आहार आणि दिनचर्या नसल्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला एखादी चांगली बातमी कळू शकते. या काळात नोकरदारांना वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मालमत्तेशी संबंधित वादामुळे तुम्हाला कोर्टात जावं लागू शकतं. जर तुम्ही व्यवसायात करत असाल तर या काळात पैशाच्या बाबतीत सावध राहा. कोणत्याही योजना किंवा व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. या आठवड्यात, प्रेमसंबंधात विचारपूर्वक पुढे जा आणि तुमच्या जोडीदाराच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. करिअर, व्यवसाय, घर किंवा कुटुंबापासून दूर जाण्याच्या अडचणींमध्ये तुमचा जोडीदार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहील.Lucky Color: Blue
Lucky Number: 6
advertisement
वृषभ (Taurus): वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय शुभ असेल. घरातील शुभ कार्याने आठवड्याची सुरुवात होईल. ज्यामध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. या काळात तीर्थक्षेत्राचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन, घर किंवा वाहनं घेण्याचा विचार करत असाल तर तुमचं स्वप्न या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कामात अपेक्षित यश मिळवू शकाल. या काळात, एखाद्या मोठ्या कौटुंबिक समस्येचं निराकरण करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या प्रयत्नांबद्दल आणि यशाबद्दल नातेवाईक तुमचं कौतुक करतील. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या मेहनतीने इतरांपेक्षा चांगली कामगिरी कराल. तुम्हाला एखादे मोठं पद किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. आरोग्याची स्थिती सामान्य राहील. तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या जोडीदारासोबत बाँडिंग चांगले असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला जाऊ शकता.Lucky Color: Green
Lucky Number: 15
advertisement
मिथुन (Gemini) : या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय मिळेल. करिअर असो किंवा बिझनेस, आयुष्याशी निगडीत कोणतीही मोठी इच्छा असो, तुम्हाला घरातून आणि बाहेर सर्वांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदारांना आठवड्याच्या सुरुवातीला मोठी संधी मिळू शकते. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. आठवड्याच्या मध्यात राजकारणाशी संबंधित लोकांना बहुप्रतिक्षित स्थान मिळू शकते. या काळात तुम्ही तुमच्या आयुष्याशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हा काळ व्यावसायिकांसाठी अतिशय शुभ असेल. पूर्वी कोणत्याही योजनेत केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल. दीर्घकाळ रखडलेल्या किंवा पुढे ढकललेल्या योजना चांगल्या मित्रांच्या मदतीने अचानक मार्गी लागतील. सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबींमध्ये अपेक्षित यश मिळेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. त्यामुळे तुमचा मान वाढेल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता.Lucky Color: Gray
Lucky Number: 9
advertisement
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अपेक्षित यश मिळविण्यासाठी आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. नाहीतर हातातून संधी जाऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला कोणतंही काम पूर्ण करताना तुम्हाला इतरांऐवजी स्वतःवर अवलंबून राहावं लागेल. नाहीतर परिणाम विपरीत होऊ शकतात. या काळात, तुम्हाला कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये बरीच धावपळ करावी लागेल. पण, प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागल्याने शीण येणार नाही. आठवड्याच्या उत्तरार्धात प्रियजनांसोबतचे तुमचे संबंध खूप चांगले असतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात मित्र, हितचिंतक किंवा जोडीदाराच्या मदतीने तुम्ही तुमच्या कोणत्याही मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित लाभ मिळतील. ध्येयपूर्तीची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. प्रेमसंबंधात जर जोडीदारासोबत वाद झाला असेल तर मैत्रिणीच्या मदतीने गैरसमज दूर होतील आणि तुमचे प्रेमसंबंध घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. हंगामी आजारांपासून सावध राहा.Lucky Color: Yellow
Lucky Number: 1
advertisement
सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात अनुकूल असेल. करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी, यशस्वी आणि फायदेशीर ठरतील. आठवड्याच्या सुरुवातीला प्रभावशाली लोकांशी संपर्क होईल. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याची आणि भविष्यात फायदेशीर योजनांवर काम करण्याची संधी मिळेल. परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. या काळात तुम्हाला मोठी डील मिळू शकते. आठवड्याच्या मध्यात, मित्राच्या मदतीने, नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर होतील आणि त्यांच्याशी तुमचे संबंध पुन्हा रुळावर येतील. पालकांसह सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. तरुणांचा बराचसा वेळ मौजमजा आणि पिकनिक इत्यादींमध्ये जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही व्यस्त असाल आणि थकवा जाणवू शकतो. या काळात तुमच्यावर कुटुंबातील जबाबदारीचं ओझं असू शकते. हंगामी किंवा कोणताही जुनाट आजार उद्भवल्यास शारीरिक वेदना होऊ शकतात. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी खूप अनुकूल असणार आहे. वैवाहिक जीवनही आनंदी राहील.Lucky Color: Pink
Lucky Number: 5
advertisement
कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहण्याची गरज आहे. ते तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठांना तुमच्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. या काळात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांबचा आणि थकवणारा प्रवास करावा लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेताना भावंडांशी मतभेद होऊ शकतात. हे सोडवण्यात घरातील ज्येष्ठ व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावेल. पद किंवा महत्त्वाच्या जबाबदारीच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकारण्यांची प्रतीक्षा आणखी थोडी वाढू शकते. व्यवसायिक लोकांना आठवड्याच्या शेवटी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कठीण स्पर्धेला सामोरे जावं लागेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सामान्य असेल. जोडीदारासोबत प्रेम आणि सौहार्दाचे संबंध राहतील. धकाधकीच्या काळात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.Lucky Color: Black
Lucky Number: 14
advertisement
तूळ (Libra) : या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींना खूप बोलावे लागेल. कारण, तुमच्या बोलण्याच्या तुमच्या कामावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होईल. अशा परिस्थितीत घर किंवा कुटुंबाशी संबंधित समस्या असो किंवा कामाशी संबंधित कोणतीही समस्या असो, ती सोडवताना तुम्हाला तुमचे शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरावे लागतील. जर तुम्ही गेल्या आठवड्यात एखाद्या समस्येने त्रस्त झाला असाल तर तीच समस्या या आठवड्यातही कायम राहील. तिच्या निराकरणासाठी थोडा वेळ थांबावं लागेल. आठवड्याच्या मध्यात करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात, कामाच्या ठिकाणी कोणाचीही चेष्टा मस्करी करू नका. नाहीतर तुमच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात कोणतेही काम करताना तुमच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक समस्या सोडवताना वडिलांच्या किंवा ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये होणारे गैरसमज अंतर निर्माण करू शकतात. भावनेच्या भरात प्रेम संबंधांशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.Lucky Color: Orange
Lucky Number: 2
advertisement
वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप आनंद घेऊन आला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मोठं यश मिळू शकतं आणि त्यामुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. कम्फर्ट आणि सुविधांशी संबंधित गोष्टी घरी आणण्याची योजना आखली जाईल. तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून सरप्राईज गिफ्ट देखील मिळू शकतं. नोकरी करणाऱ्यांची इच्छित ठिकाणी बदली किंवा बढती शक्य आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. कोर्टात केस सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात, तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल कारण मुलांशी संबंधित एखादी मोठी चिंता दूर होईल. व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. व्यवसाय विस्तारासाठी नवीन योजना आखल्या जातील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. या आठवड्यात तुम्ही जुन्या मित्रांनाही भेटू शकता. ज्यांच्यासोबत तुम्हाला आनंदाने वेळ घालवण्याची आणि जुन्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील.Lucky Color: Purple
Lucky Number: 8
advertisement
धनू (Sagittarius) : धनु राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात त्यांचं आरोग्य आणि नातेसंबंधांकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आहाराच्या निष्काळजीपणामुळे किंवा एखादा जुनाट आजार उद्भवल्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. निष्काळजीपणामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्येही जाण्याची गरज पडू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत तुमचं पटत नसेल तर त्याच्याशी वाद घालण्याऐवजी त्याच्यापासून लांब राहणं योग्य ठरेल. छोट्या-छोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नका नाहीतर तुमचा विनाकारण अपमान होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात तुम्ही गरजेपेक्षा जास्त व्यग्र असाल. या काळात तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि उर्जेचं व्यवस्थापन करावं लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. आठवड्याच्या शेवटी त्यांना एखादी चांगली बातमी कळू शकते. प्रेमसंबंधांबाबत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमचा जोडीदार कठीण काळात तुमची ढाल बनेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या जोडीदाराची एखादी मोठी कामगिरी तुमचा मान वाढवेल. आहार आणि दिनचर्या योग्य ठेवा.Lucky Color: White
Lucky Number: 7
advertisement
मकर (Capricorn) : मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचं पूर्ण फळ मिळणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीच्या ठिकाणी गेल्या काही दिवसांत केलेल्या चांगल्या कामासाठी तुमचा सन्मान होऊ शकतो. वरिष्ठ आणि कनिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. या आठवड्यात व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहे. गेल्या आठवड्यापासून ज्या घरगुती समस्यांमुळे तुम्ही चिंतेत आहात त्यांचं या आठवड्यात निराकरण होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटाल. तिच्या मदतीने प्रलंबित असलेली कामे क्षणार्धात पूर्ण होतील. प्रेमसंबंध दृढ होतील. तुमच्या प्रेमाला कुटुंबाकडून मान्यता मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही जोडीदारासोबत लांब किंवा जवळच्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता.Lucky Color: Brown
Lucky Number: 11
advertisement
कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्याची सुरुवात थोडी आव्हानात्मक असेल. पण, तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने, हुशारीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास सक्षम असाल. विशेष म्हणजे कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला जवळचे मित्र आणि नातेवाईकांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. कारण, ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकतात. जमीन आणि इमारतींशी संबंधित प्रकरणांसाठी कोर्टात जावं लागेल. आठवड्याच्या पूर्वाधापेक्षा उत्तरार्ध आरामदायी असेल. घरातील शुभ कार्य पूर्ण होतील. ज्यामध्ये तुम्हाला नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. जे लोक खूप दिवसांपासून आपलं कार्यक्षेत्र बदलण्याचा विचार करत होते त्यांना एखादी चांगली ऑफर मिळू शकते. पण, कोणताही निर्णय घेताना त्यांनी त्यांच्या हितचिंतकांचा सल्ला घेतला पाहिजे. हा काळ तुमच्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या अतिशय अनुकूल असेल. व्यवसायातही तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. किरकोळ समस्या सोडल्यास आरोग्य सामान्य राहील.Lucky Color: Maroon
Lucky Number: 3
advertisement
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय शुभ असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. व्यवसायिक बाबी अनुकूल राहतील आणि समाधानकारक वाढ दिसून येईल. मार्केटमध्ये अडकलेले पैसेही अनपेक्षितपणे मिळतील. करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या हितचिंतकांच्या मदतीने वेळेपूर्वी ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीसाठी सन्मानित केलं जाऊ शकतं. मुलांनी मिळवलेल्या यशामुळे तुमचाही आदर वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात शांततेत वेळ घालवण्यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी जावंसं वाटेल. या काळात तुम्ही अचानक दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. तुमचं मन धार्मिक-आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात व्यग्र राहील. प्रेमप्रकरणांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. अगोदरपासून सुरू असलेले प्रेमप्रकरण आणखी दृढ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील.Lucky Color: Violet
Lucky Number: 4









