असाही स्वामीभक्त! फोटोमधून दर्शन, 900 पारायण केली पूर्ण, आता पिंपरीमध्ये उभारला स्वामी समर्थांचा मठ, Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
. स्वामीभक्त मालती पांडे यांच्या घरी स्वामींच्या पादुका आल्यावर त्यांनी या मठाची स्थापना केली. पादुका त्यांच्या घरी कशा आल्या यामागे स्वामींची एक अद्भुत लीला असल्याचे सांगितले जाते.
पुणे: श्री स्वामी समर्थ महाराजांचा 20 मार्चला प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात स्वामींचे लाखो भक्त आहेत. या निमित्ताने आकुर्डी येथील संभाजीनगर परिसरातील स्वामींच्या पहिल्या मठाविषयी जाणून घेणार आहोत. स्वामीभक्त मालती पांडे यांच्या घरी स्वामींच्या पादुका आल्यावर त्यांनी या मठाची स्थापना केली. पादुका त्यांच्या घरी कशा आल्या यामागे स्वामींची एक अद्भुत लीला असल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर त्यांनी भक्तांसाठी मठ सुरू केला. या सर्व घटनेबद्दल मालती पांडे यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
advertisement
अक्कलकोटमध्ये आरतीदरम्यान फोटोमधून स्वामींचे दर्शन
मालती पांडे यांनी सांगितले की, त्यांचे पती श्रीपाद पांडे हे श्री स्वामी समर्थ यांचे निष्ठावान भक्त होते. त्यांच्या प्रेरणेने त्या दर गुरुवारी मठात जाऊन दोन अध्यायांचे वाचन करत होत्या. महाराजांची सेवा करत असताना श्रीपाद पांडे यांना गुरुलीलामृत हा ग्रंथ मिळाला. त्यानंतर दररोज एक अध्याय वाचण्यास सुरुवात झाली. पुढे खेड महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मालती पांडे यांनी दररोज चार अध्याय वाचत 101 पारायण पूर्ण केली. त्यानंतर त्या अक्कलकोट येथे गेल्या असता, आरतीदरम्यान त्यांनी महाराजांच्या दर्शनासाठी प्रार्थना केली. त्यावेळी मंदिरातील फोटोमधूनच स्वामी समर्थांनी दर्शन दिल्याचं त्यांनी सांगितलं. हा स्वामींचा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही, असं मालती पांडे यांनी सांगितलं.
advertisement
Weather Alert: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात वादळाची एंट्री, सर्वदूर पाऊस कोसळणार, 31 जिल्ह्यांना अलर्ट
मठाची स्थापना कशी झाली?
मालती पांडे यांची स्वामी समर्थांवरील भक्ती सुरूच होती. पुण्यातील डांगे महाराज हेही स्वामी भक्त होते. मालती पांडे या स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी डांगे महाराजांकडे नियमित जात असत. एकदा डांगे महाराजांना स्वामी समर्थांनी प्रचिती देत सांगितले की, तुझी सेवा आता पूर्ण झाली आहे, या पादुका मालती पांडे यांना दे. त्यानंतर डांगे महाराजांनी त्या पवित्र पादुका मालती पांडे यांना दिल्या आणि त्यांची सेवा करण्यास सांगितले. मालती पांडे यांनी त्या पादुका आकुर्डी येथील संभाजीनगर येथे स्थापन केल्या. गेल्या 35 वर्षांपासून त्या मनापासून या पादुकांची सेवा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी स्वामींची तब्बल 900 पारायण पूर्ण केली आहेत. आणि इतर भक्तांनाही या पादुकांचे दर्शन मिळावं म्हणून त्यांनी या ठिकाणी मठाची स्थापना केली.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 9:30 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
असाही स्वामीभक्त! फोटोमधून दर्शन, 900 पारायण केली पूर्ण, आता पिंपरीमध्ये उभारला स्वामी समर्थांचा मठ, Video







