advertisement

Shivam Dube : अहमदाबादवरून ट्रेनने मुंबईला आलो, कारण... वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबे झाला इमोशनल!

Last Updated:

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबेने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर ट्रेनने मुंबई गाठली. फायनलच्या काही तासांमध्येच दुबे विमानाऐवजी ट्रेनने मुंबईमध्ये पोहोचला.

अहमदाबादवरून ट्रेनने मुंबईला आलो, कारण... वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबे झाला इमोशनल!
अहमदाबादवरून ट्रेनने मुंबईला आलो, कारण... वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबे झाला इमोशनल!
मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबेने टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर ट्रेनने मुंबई गाठली. फायनलच्या काही तासांमध्येच दुबे विमानाऐवजी ट्रेनने मुंबईमध्ये पोहोचला. टीम इंडियाने 8 मार्चला न्यूझीलंडचा पराभव करून टी-20 वर्ल्ड कपची फायनल जिंकली. या सामन्यानंतर भारतीय खेळाडू सेलिब्रेशन करत होते, पण शिवम दुबेने हळूच अहमदाबादवरून ट्रेन पकडली आणि तो मुंबईमध्ये आला.

वडिलांना भेटण्याची घाई

शिवम दुबेने ट्रेनने मुंबईला यायचं कारण अखेर सांगितलं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मला घरी जायची घाई झाली होती. घरी जाऊन मला मुलं आणि वडिलांना भेटायचं होतं, त्यामुळे मी सकाळीच घरासाठी रवाना झालो. कधी एकदा घरी पोहोचतोय, असं मला झालं, असं शिवम दुबे म्हणाला आहे.

फ्लाईट मिळाली नाही, ट्रेनने गेलो

advertisement
मी माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी फ्लाईट तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, पण अहमदाबादवरून मुंबईला जाणारी सगळी फ्लाईट फूल होती, त्यामुळे मी ट्रेनने जायचा निर्णय घेतला. मी कारनेही मुंबईला पोहोचू शकलो असतो, पण ट्रेन जास्त लवकर पोहोचते म्हणून मी ट्रेनने निघालो, असं वक्तव्य दुबेने केलं आहे.

थ्री टियर एसीने प्रवास

शिवम दुबे त्याची पत्नी आणि एका मित्रासह थ्री टियर एसी कोचमधून ट्रेनने मुंबईमध्ये आला. शिवम दुबेच्या या निर्णयामुळे त्याचं कुटुंब आणि मित्रही थोडे चिंतेत होते. स्टेशन किंवा ट्रेनवर कुणी ओळखलं तर काय होईल? अशी भीती शिवम दुबेच्या कुटुंबाला वाटत होती.
advertisement

मास्क अन् कॅपने लपवली ओळख

चाहत्यांच्या गर्दीपासून वाचण्यासाठी शिवम दुबेने कॅप, मास्क आणि फूल स्लीव्हचा टी-शर्ट घातला होता, त्यामुळे त्याला कुणीच ओळखू शकलं नाही. अहमदाबादवरून दुबेने पहाटे 5.10 ची ट्रेन पकडली, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर गर्दी कमी असेल. ट्रेन सुटायच्या 5 मिनीट आधीपर्यंत मी कारमध्ये बसलो होतो आणि पटकन ट्रेनमध्ये चढलो, असं दुबेने सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shivam Dube : अहमदाबादवरून ट्रेनने मुंबईला आलो, कारण... वर्ल्ड चॅम्पियन शिवम दुबे झाला इमोशनल!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement