Astro Tips : मंगळवारी चुकूनही करू नका 'ही' 8 कामं, अन्यथा हनुमानजी होतील नाराज
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मंगळवारी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे, जसे की पैसे उधार घेणे-देणे, नखे कापणे, मांसाहार, गुंतवणूक, धारधार वस्तू खरेदी करणे. हनुमानजींच्या कृपेसाठी हनुमान चालीसा पठण करा आणि प्रसाद अर्पण करा.
मंगळवार हा शक्ती, भक्ती आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमानाला समर्पित आहे. ज्योतिषी अनुशल त्रिपाठी यांच्या मते, या दिवशी काही कामे टाळायला हवीत, अन्यथा नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. मंगळवारी चुकूनही कोणती कामं करू नयेत, याबद्दल माहिती खालीलप्रमाणे...
पैशाचे व्यवहार टाळा : मंगळवारी कोणाकडूनही पैसे घेणे किंवा देणे टाळावे. असे मानले जाते की, या दिवशी घेतलेले कर्ज परतफेड करण्यात अडचणी येतात आणि दिलेले कर्ज परत मिळण्यासही त्रास होतो.
धारदार वस्तू खरेदी करू नका : या दिवशी चाकू, कैची, ब्लेड किंवा इतर तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नयेत. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा रक्त आणि युद्धाचे कारण मानला जातो, त्यामुळे तीक्ष्ण वस्तू खरेदी केल्याने कुटुंबात वाद वाढू शकतात.
advertisement
राग आणि भांडणे टाळा : मंगळवारी घरात राग आणि भांडणे टाळावीत. हनुमानजी हे शांती आणि संयमाचे प्रतीक आहेत, त्यामुळे या दिवशी राग केल्याने त्यांची कृपा प्राप्त होत नाही.
केस आणि नखे कापू नका : मंगळवारी केस कापणे, दाढी करणे आणि नखे कापणे टाळावे. असे केल्याने मंगळ देव आणि हनुमानजी कोपतात आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते.
advertisement
प्लास्टिकच्या वस्तू भेट देऊ नका : मंगळवारी कोणालाही प्लास्टिकच्या वस्तू भेट देऊ नयेत. असे केल्याने संबंध बिघडू शकतात.
मांस आणि मद्य सेवन करू नका : मंगळवारी मांस, मद्य आणि इतर मांसाहारी पदार्थ सेवन करू नये. हनुमानजी ब्रह्मचारी होते, त्यामुळे या दिवशी सात्विक भोजन करावे.
काळी कपडे घालू नका : मंगळवारी काळे कपडे घालणे टाळावे. या दिवशी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते.
advertisement
गुंतवणूक करू नका : मंगळवारी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे. या दिवशी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत नाही, असे मानले जाते.
काय करावे?
याउलट, मंगळवारी हनुमानजींची पूजा करणे, हनुमान चालिसाचे पठण करणे आणि त्यांना लाडू किंवा बुंदीचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर आपली कृपा दृष्टी ठेवतात.
advertisement
हे ही वाचा : Astrology: जानेवारीतच उघडेल 4 राशींच्या नशिबाचं टाळं, मिळेल प्रचंड सुख, ग्रहांचा राजा करेल कृपा!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 07, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Astro Tips : मंगळवारी चुकूनही करू नका 'ही' 8 कामं, अन्यथा हनुमानजी होतील नाराज