ही आहे घरात सोनं ठेवण्याची योग्य दिशा, चुकीच्या दिशेला ठेवलं तर होईल मोठं नुकसान

Last Updated:

सोने हे पिवळे आणि अतिशय शुद्ध धातू आहे. त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे ते कोणत्याही दिशेला ठेवू नये. जर तुम्ही असे केले तर घरामध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : प्रत्येकजण सोन्याचे दागिने आपल्या लॉकरमध्ये ठेवतात. मात्र, सोन्याचे दागिने ठेवण्याची योग्य दिशा कोणतीह आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही घरात योग्य दिशेला सोने ठेवले तर तुमच्या घरात सुख समृद्धी येईल. तसेच कायम तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न राहाल. मात्र, जर चुकीच्या दिशेने सोने ठेवले तर मग त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो.
advertisement
झारखंडची राजधानी रांची येथील ज्योतिषी आचार्य संतोष कुमार चौबे यांनी याबाबत माहिती दिली. ते रांची विद्यापीठातून ज्योतिष शास्त्रात सुवर्णपदक विजेते आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सोने ठेवण्याचे काही नियम आहे. सोने हे पिवळे आणि अतिशय शुद्ध धातू आहे. त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे ते कोणत्याही दिशेला ठेवू नये. जर तुम्ही असे केले तर घरामध्ये त्याचा विपरीत परिणाम होऊ लागतो.
advertisement
वाघांचं भारतातील सर्वात मोठं कुटूंब, 1-2 दोन नव्हे राहतात तब्बल इतके सदस्य, अनोखी गोष्ट
ते पुढे म्हणाले की, सोने ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही उत्तर-पूर्व आहे. या दिशेच्या मधली जागा ईशान्य दिशा मानली जाते आणि ती अत्यंत पवित्र दिशा आहे, कारण या दिशेला गुरु ग्रहाचे वास्तव्य आहे. त्यांना पिवळ्या वस्तू खूप आवडतात आणि सोनेही पिवळे आणि शुद्ध असते. त्यामुळे या दिशेला सोने ठेवल्यास तेथे गुरूची स्थापना होते आणि गुरु ग्रहाच्या स्थापनेमुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची कमतरता भासणार नाही.
advertisement
वैवाहिक आयुष्यात आहे तणाव, दररोज होतायेत वाद, तर मग सर्वात आधी करा हा उपाय
तसेच घरात सकारात्मक उर्जा राहील. इतकेच नव्हे तर घरात आळस, आजारपण यांसारख्या गोष्टी दिसणार नाहीत. हे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. सोने ठेवण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे.
या दिशाही शुभ -
यासोबतच दक्षिण पश्चिम ही दिशाही शुभ आहे. याठिकाणी जी वस्तू तुम्ही ठेवतात ती लवकर संपत नाही आणि दीर्घकाळ टिकते. तुम्ही याठिकाणी सोने ठेवल्यावर ते दीर्घकाळ सुरक्षित असण्याची गरंटी आहे. तसेच तिसरी जागा आणि उत्तर दिशा. याठिकाणी माता लक्ष्मी आणि कुबेरजीला आपले घर मानले जाते.
advertisement
उत्तर दिशेला सोन्याचे दागिने ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. कुबेरजी खुश होतात आणि घरात सोन्या-चांदीची काहीच कमी राहत नाही. यश वैभव कायम राहते. त्यामुळे तुम्ही जर त्या दिशांपैकी कोणत्याही एका दिशेला सोने ठेवले तर तुम्हाला त्याचा खूप चांगला प्रभाव पाहायला मिळू शकतो.
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
ही आहे घरात सोनं ठेवण्याची योग्य दिशा, चुकीच्या दिशेला ठेवलं तर होईल मोठं नुकसान
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement