Ganesh Jayanti 2025: गणेश जयंती आज, या शुभ मुहूर्तावर करा पूजा-विधी, पूजन सामग्री, धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Ganesh Jayanti Shubh Muhurat Puja Vidhi: दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीवर गणेश जयंती साजरी केली जाते. हा दिवस सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी गणेश जयंती आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी आहे.
मुंबई : गणेश जयंती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीवर गणेश जयंती साजरी केली जाते. हा दिवस सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी गणेश जयंती आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. गणेश जयंतीच्या व्रत-उपासनेची पद्धत काय आहे? पंडित अनील शर्मा याबद्दल माहिती देत आहेत.
शुभ मुहूर्त - गणेश जयंतीच्या दिवशी मध्याह्न गणेश पूजा मुहुर्त सकाळी 11.31 ते दुपारी 1:40 पर्यंत असेल. गणेश भक्तांना बाप्पाची उपासना पूजा करण्यासाठी एकूण 2 तास 2 मिनिटांचा मिळतील. या व्यतिरिक्त वर्जित चंद्र दर्शनची वेळ रात्री 09.02 ते 09.07 या वेळेत आहे.
पूजा पद्धत - गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नंतर एका पाटावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. गणरायाला गंगाजलाने स्नान करा आणि नंतर त्यांना धूप, दिवे, फुले, रोली, दुर्वा, सुपारी, फळे आणि मिठाई अर्पण करा.
advertisement
पूजेनंतर गणपतीला प्रिय मोदक अर्पण करा आणि नंतर गणेश जयंतीची कथा वाचा किंवा ऐका. आपण गणेश मंत्रांचा देखील जप करू शकतो. पूजेच्या शेवटी गणेशाची आरती करा आणि सर्वांना प्रसाद वितरित करा.
गणेश जयंतीचे महत्त्व - गणेशाची उपासना विघ्नहर्ता प्रतीक म्हणून केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. नवीन कामांच्या सुरुवातीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी उपवास करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 7:02 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganesh Jayanti 2025: गणेश जयंती आज, या शुभ मुहूर्तावर करा पूजा-विधी, पूजन सामग्री, धार्मिक महत्त्व


