Gauri Pujan 2024: ज्येष्ठा गौरी पूजन स्थापना तारीख, पूजा पद्धत जाणून घ्या
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Gauri Pujan 2024: महालक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे, सर्व गोष्टींनी संपन्न आहे, म्हणून भक्त समृद्ध जीवनासाठी गौरी महालक्ष्मीची पूजा करतात. हे व्रत पाळणे शुभ मानले जाते.
महाराष्ट्रातील मुख्य सणांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ गौरी पूजन हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. स्त्रिया अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी हे व्रत करतात.
गौरी पूजन किंवा ज्येष्ठ गौरी पूजन या नावानेही ओळखला जातो, या वर्षी 10 सप्टेंबर रोजी शुभ सण सुरू होणार आहे आणि 12 सप्टेंबर 2024 रोजी संपेल.
ज्येष्ठा गौरी पूजा आणि विसर्जन तारखा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 रोजी
advertisement
ज्येष्ठा गौरी आव्हान मुहूर्त
सकाळी 6:04 ते संध्याकाळी 6:32 पर्यंत
कालावधी - 12 तास 28 मिनिटे
ज्येष्ठा गौरी पूजन
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी
गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन
अनुराधा नक्षत्र सुरू होईल - 9 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6:04 वाजता
अनुराधा नक्षत्र संपेल - 10 सप्टेंबर 2024 रात्री 8:04 वाजता
advertisement
ज्येष्ठा गौरी पूजन पद्धत
माता गौरीला शुद्ध पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ स्टूलवर कापड पसरावे. त्यावर गौरी विराजमान कराव्यात. त्यानंतर गौरीला साडी नेसवून सोळा अलंकार केले जातात.
त्यानंतर गौरीचं कपाळावर हळद, कुंकू आणि अक्षत लावतात. ज्येष्ठा गौरीच्या दिवशी गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका शुभ मुहूर्तावर केली जाते.
Radha Ashtami 2024: राधाअष्टमी व्रत केल्याने होतील चमत्कारिक फायदे! श्रीकृष्णही होतात प्रसन्न
नैवेद्याच्या दुसऱ्या दिवशी 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पदार्थ गौरीला अर्पण केले जातात. यानंतर 16 दिव्यांनी गौरीची आरती करण्याची श्रद्धा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2024 11:32 AM IST


