Gudi Padwa: गोदाकाठी नववर्षाचे जल्लोषी स्वागत, 100 महिलांनी साकारली महारांगोळी, काय आहे खास?

Last Updated:

Gudi Padwa 2025: नाशिकमधील गोदावरी काठी हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांची महारांगोळी याठिकाणी रेखाटण्यात आलीये.

+
Gudi

Gudi Padwa: गोदाकाठी नववर्षाचे जल्लोषी स्वागत, 100 महिलांनी साकारली अहिल्यादेवी होळकर यांची महारांगोळी!

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. आज मराठी नववर्षानिमित्त सर्वत्र उत्साह आहे. धार्मिक नगरी मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरात देखील नववर्षाचं स्वागत वेगवेगळ्या कार्यक्रमांनी होतंय. शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंगांचे रांगोळी काढून चित्रण करण्यात आले आहे. पंचवटी परिसरातील गोदावरी काठावर तब्बल 20 हजार चौरस फुटांत ही महारांगोळी साकारली आहे.
advertisement
नववर्षाच्या स्वागतानिमित्त नाशिक येथील हिंदू नववर्ष स्वागत महोत्सव समितीच्या वतीने गोदाकाठी महारांगोळी साकारली आहे. अहिल्यादेवींचे आठवे वंशज नानासाहेब होळकर यांच्या हस्ते रांगोळीचा पहिला ठिपका ठेवत उपक्रमाचा श्रीगणेशा केला. जवळपास 100 महिलांच्या योगदानातून ही महारांगोळी साकारण्यात आली आहे. अहिल्यादेवी यांच्या जन्माच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व हे पैलू मुख्यतः रांगोळीत अधोरेखित करण्यात आले आहे.
advertisement
400 किलो रांगोळी अन् 2500 किलो रंग
अहिल्यादेवी होळकर यांची ही महारांगोळी साकारण्यासाठी 400 किलो रांगोळी आणि 2,500 किलो रंगांचा वापर करण्यात आला. इतकेच नाही तर ही रांगोळी शंभर महिलांनी तब्बल 4 तासात साकारली आहे. रांगोळीचे डिझाईन व 3 महिलांकडून रांगोळी प्रत्यक्षात उतरवून घेण्याचे काम निलेश देशपांडे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती गरुड, मयूरी शुक्ल, सुजाता कापुरे, श्रीकांत वाणी, प्रफुल्ल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
advertisement
दरम्यान, महारांगोळीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यातील काही प्रेरणादायी प्रसंग रांगोळी स्वरूपात रेखाटण्यात आले आहेत. त्यामुळे ही महारांगोळी पाहण्यासाठी नाशिककरांनी गोदाकाठी गर्दी केली. तसेच हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gudi Padwa: गोदाकाठी नववर्षाचे जल्लोषी स्वागत, 100 महिलांनी साकारली महारांगोळी, काय आहे खास?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement