तुमच्या तळहातातच लपलंय तुमचं नशीब, हातावरच 'हे' चिन्ह मानलं जातं अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यवान!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हस्तरेषाशास्त्र किंवा समुद्र शास्त्र हे मानवी नशिबाचा आरसा मानले जाते. आपल्या हातावरील रेषा केवळ रेषा नसून, त्या आपल्या भूतकाळ, भविष्य आणि स्वभावाचे संकेत देतात.
Palmistry : हस्तरेषाशास्त्र किंवा समुद्र शास्त्र हे मानवी नशिबाचा आरसा मानले जाते. आपल्या हातावरील रेषा केवळ रेषा नसून, त्या आपल्या भूतकाळ, भविष्य आणि स्वभावाचे संकेत देतात. हस्तरेषांमध्ये अनेक प्रकारची चिन्हे असतात, जसे की 'M', 'X' किंवा त्रिकोण. मात्र, 'H' हे अक्षर हातावर असणे अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यवान मानले जाते. ज्या व्यक्तींच्या तळहातावर तीन महत्त्वाच्या रेषांच्या संयोगातून 'H' हे अक्षर तयार होते, त्यांचे आयुष्य सामान्य नसते. चला तर मग जाणून घेऊया, या 'H' चिन्हाचा नेमका अर्थ काय आहे.
तळहातावर 'H' चिन्ह कसे तयार होते?
हस्तरेषा शास्त्रानुसार, 'H' चिन्ह हे मुख्यत्वे तीन रेषांच्या जोडणीतून बनते. हृदय रेषा जी आपल्या भावना दर्शवते. शिरोरेषा जी आपली बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता दर्शवते. भाग्य रेषा जी आपल्या नशिबाची साथ आणि प्रगती दर्शवते. जेव्हा भाग्य रेषा शिरोरेषा आणि हृदय रेषेला एका छोट्या रेषेने जोडते, तेव्हा 'H' ही आकृती तयार होते. हे चिन्ह ज्यांच्या हातात असते, त्यांच्या आयुष्यात बुद्धिमत्ता, भावना आणि नशीब या तिन्हींचा सुरेख संगम पाहायला मिळतो.
advertisement
'H' चिन्ह असलेल्या व्यक्तींची प्रमुख वैशिष्ट्ये
वयाच्या 30-35 नंतर प्रचंड भाग्योदय: समुद्र शास्त्रानुसार, ज्यांच्या हातावर 'H' चिन्ह असते, त्यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागतो. मात्र, वयाची 30 ते 35 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या व्यक्तींच्या नशिबात अचानक टर्निंग पॉईंट येतो. या काळानंतर त्यांना मागे वळून पाहावे लागत नाही आणि ते यशाच्या शिखरावर पोहोचतात.
advertisement
भावनिक पण व्यवहारिक बुद्धिमत्ता: या व्यक्ती मनाने खूप दयाळू आणि हळव्या असतात. मात्र, संकटकाळी किंवा व्यवसायात निर्णय घेताना त्या तितक्याच व्यवहारिक बनतात. भावना आणि बुद्धी यांचा योग्य समतोल साधण्यात या व्यक्ती माहीर असतात.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता: अशा व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्तीपेक्षा स्वतःच्या कष्टाने मिळवलेले यश जास्त प्रिय असते. ते अतिशय मेहनती असतात आणि शून्यातून आपले साम्राज्य उभे करतात. समाजात त्यांना मोठी प्रतिष्ठा आणि मान-सन्मान लाभतो.
advertisement
मदत करण्याची वृत्ती: 'H' अक्षर असलेल्या व्यक्ती परोपकारी असतात. त्यांच्याकडे पैसा आला की ते केवळ स्वतःचा विचार करत नाहीत, तर गरिबांना आणि गरजूंना सढळ हाताने मदत करतात. त्यांच्या या गुणामुळेच त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा असते.
कठीण परिश्रमानंतरच फळ: यांना आयुष्यात 'शॉर्टकट' मिळत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट कष्ट करूनच मिळवावी लागते. मात्र, एकदा यश मिळाले की ते दीर्घकाळ टिकते. या व्यक्ती सहजासहजी हार मानत नाहीत, हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 5:55 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुमच्या तळहातातच लपलंय तुमचं नशीब, हातावरच 'हे' चिन्ह मानलं जातं अत्यंत दुर्मिळ आणि भाग्यवान!






