Tulsi vivah 2025: पंचक लागलेलं असताना तुळशी विवाह कसा करणार? शुभ मुहूर्त, विधी-तिथी जाणून घ्या
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Vivah Astrology: तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवसापासून मागील चार महिन्यांपासून थांबलेली सर्व शुभ-मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतात. आज 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जात आहे.
मुंबई : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला भगवान विष्णूचे अवतार भगवान शाळीग्राम आणि माता तुळशी यांचा विवाह लावला जातो. पण, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तुळशी विवाहासाठी श्रीकृष्णाची मूर्ती तुळशीत ठेवली जाते. तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. कारण याच दिवसापासून मागील चार महिन्यांपासून थांबलेली सर्व शुभ-मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतात. आज 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जात आहे. संपूर्ण विधी-विधानाने आणि रितीरिवाजांनुसार तुळशीजींचा विवाह संपन्न केल्यानं जीवनात सुख-समृद्धी वाढते, घरात आनंद येतो आणि वैवाहिक जीवन सुखी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
यावर्षी तुळशी विवाह पंचकात येत असला तरी, या शुभ कार्याला कोणताही दोष नाही. कारण भगवान विष्णू आणि माता तुळशी (लक्ष्मीचे रूप) यांच्या पूजेवर पंचकाचा कोणताही प्रभाव पडत नाही. यामुळे पंचक काळामुळे तुळशी विवाहाच्या विधींमध्ये कोणतीही बाधा येणार नाही आणि हे कार्य करणे पूर्णपणे शुभ राहील.
advertisement
वैदिक पंचांगानुसार, द्वादशी तिथी 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 07:31 वाजल्यापासून सुरू झाली आहे आणि ती 3 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 05:07 वाजेपर्यंत राहील. तुळशी विवाहासाठी गोधूलि बेलेतील शुभ मुहूर्त आज, 2 नोव्हेंबर 2025, सायंकाळी 05:06 ते 06:43 वाजेपर्यंत आहे.
विधीसाठी तुळशीमध्ये श्रीकृष्णाला ठेवावं, त्यांना एका पाटावर विराजमान करून गंगाजल आणि पंचामृतने अभिषेक करावा आणि तुळशी मातेला गंगाजलाने स्नान घालावे. त्यानंतर दोघांना नवीन वस्त्रे, दागिने आणि फुलांनी सजवावे. तुळशीला लाल चुनरी अर्पण करून बांगड्या वाहाव्यात. दोघांनाही पुष्पमाला अर्पण करून हळद-कुंकू लावावे. श्रीकृष्णाची मूर्ती हातात घेऊन तुळशीच्या रोपाभोवती सात वेळा प्रदक्षिणा करून मंत्रोच्चार करावा. विधी पूर्ण झाल्यावर आरती करावी आणि फळे व मिठाईचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद सर्वांना वाटावा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Tulsi vivah 2025: पंचक लागलेलं असताना तुळशी विवाह कसा करणार? शुभ मुहूर्त, विधी-तिथी जाणून घ्या


