कुंडलीत गुरु दोष आहे? तर गुरु पोर्णिमेला करा 'हे' उपाय; भाग्य उजळेल अन् करिअरमध्ये होईल प्रगती!

Last Updated:

गुरुपौर्णिमा हा गुरुंचा सन्मान करण्याचा पवित्र दिवस आहे. यंदा ती १० जुलै रोजी आहे. वेदव्यासांच्या जन्मामुळे याला व्यास पौर्णिमा देखील म्हणतात. गुरु दोष निवारणासाठी...

Guru Purnima 2025
Guru Purnima 2025
हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तिथीला खूप महत्त्व आहे. एका वर्षात अनेक पौर्णिमा येतात. त्या पौर्णिमांमध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गुरूंचे महत्त्व विशेषत्वाने सांगितले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. यासोबतच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. कारण या दिवशी महर्षी वेद व्यासजींचा जन्म झाला होता, ज्यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली.
या दिवसाचे महत्त्व ज्योतिषशास्त्रात सविस्तरपणे सांगितले आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीला गुरु दोषातून मुक्ती मिळते, असेही म्हटले आहे. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्याकडून ते उपाय जाणून घेऊया...
गुरुपौर्णिमा कधी साजरी होणार?
वैदिक कॅलेंडरनुसार, ज्योतिषी सांगतात की आषाढ पौर्णिमा 10 जुलै रोजी पहाटे 02:43 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जुलै रोजी पहाटे 01:53 वाजता समाप्त होत आहे. उदयतिथीनुसार, गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजीच साजरी केली जाईल.
advertisement
गुरुपौर्णिमेला करा हे उपाय
1) गुरु दोषाचे वाईट परिणाम दूर करण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी, गुरुपौर्णिमेला आपल्या पूजाघरात गुरु यंत्र स्थापित करा आणि त्याची पूजा करा. त्यानंतर, प्रत्येक गुरुवारी विधीनुसार पूजा करा. यामुळे तुमच्या जीवनात गुरु ग्रहाचा सकारात्मक प्रभाव वाढेल; तुम्हाला प्रगती मिळेल. कमजोर गुरु ग्रह मजबूत होईल.
2) जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती करायची असेल, तर गुरुपौर्णिमेला पिवळे कपडे, पिवळी मसूर डाळ, केशर, तूप, पितळेची भांडी, पिवळी मिठाई इत्यादी वस्तू दान करू शकता.
advertisement
3) असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी असे केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतात, असे मानले जाते.
4) गुरुपौर्णिमेला स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या खास दिवशी गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पिवळी मसूर डाळ, पिवळे कपडे किंवा या रंगाची मिठाई दान करा. असे केल्याने जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात.
advertisement
मराठी बातम्या/अध्यात्म/
कुंडलीत गुरु दोष आहे? तर गुरु पोर्णिमेला करा 'हे' उपाय; भाग्य उजळेल अन् करिअरमध्ये होईल प्रगती!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement