Mahabhahrat : 5 पती, 5 मुलं तरी कुमारी, अद्भुत आहे द्रौपदीची कहाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mahabhahrat story : महाभारतातील द्रौपदीबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण आज आम्ही तुम्हाला द्रौपदीच्या त्या रहस्याबद्दल सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहिती आहे.
नवी दिल्ली : महाभारतात अशा अनेक मनोरंजक कथा आहेत, ज्या आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. आजही लोकांना या महाकाव्यातील प्रत्येक पात्र वाचायला आणि जाणून घ्यायला आवडतं. महाभारतातील द्रौपदीबद्दल तुम्हाला माहिती असेलच, पण आज आम्ही तुम्हाला द्रौपदीच्या त्या रहस्याबद्दल सांगणार आहोत, जे फार कमी लोकांना माहिती आहे. पाच पती आणि पाच मुलं असूनही द्रौपदी कुमारी राहिली, ते कसं काय? ते आपण जाणून घेऊया.
खरंतर द्रौपदीला द्रौपदी असं म्हटलं जात असे कारण ती राजा द्रुपदाची कन्या होती आणि राजा द्रुपद पांचाळ देशाचा राजा होता, म्हणूनच द्रौपदीला पांचाली असंही म्हणतात. यज्ञापासून जन्माला आल्यामुळे तिला यज्ञसेनी असंही म्हटलं जात असे आणि भगवान श्रीकृष्णाची मैत्रीण असल्याने द्रौपदीला कृष्णा असंही म्हटलं जात असे.
महाभारतातील या नायिकेला आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं पण तिने कधीही हार मानली नाही किंवा ती कोणाला घाबरली नाही. द्रौपदीचे व्यक्तिमत्व अग्नीसारखं जळतं आहे, हे महिला सक्षमीकरणाचं प्रतीक आहे. जेव्हा सर्वांसमोर द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, तेव्हा तिनं ज्ञानी आणि महान भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य यांसारख्या महान योद्ध्यांची कठोर शब्दात निंदा केली. संपूर्ण जगात द्रौपदीसारखी स्त्री कधीच नव्हती, जिच्यावर इतके अत्याचार झाले असले तरी ती धर्माच्या मार्गावर चालत राहिली.
advertisement
द्रौपदी दिव्य कन्या
शास्त्रांमध्ये द्रौपदीला दिव्य कन्या किंवा अखंड कुमारी म्हटलं आहे. पाच पती असूनही द्रौपदी आयुष्यभर कुमारी कशी राहिली. द्रौपदीला आयुष्यभर कुमारी राहण्याचं वरदान मिळालं होतं.
पौराणिक कथेनुसार, द्रौपदीने तिच्या मागील जन्मात भगवान शिवासाठी तपश्चर्या केली होती. तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव द्रौपदीला वरदान देऊ इच्छित होते. मग द्रौपदी म्हणाली की तिला असा पती हवा आहे ज्यामध्ये 14 गुण असतील.
advertisement
भगवान शिव यांनी वरदान दिलं पण एकाच व्यक्तीमध्ये सर्व 14 गुण असणं अशक्य होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की ती पाच व्यक्तींची पत्नी होईल ज्यांच्याकडे सर्व 14 गुण असतील. द्रौपदीला पाच पांडवांच्या रूपात पती मिळाले ज्यांच्याकडे सर्व 14 गुण होते.
कुमारी राहण्याचं वरदान
सर्व गुणांसोबतच भगवान शिवाने द्रौपदीला आणखी एक वरदान दिलं होतं की लग्न झाल्यानंतरही ती नेहमीच कुमारी राहील. दररोज आंघोळ केल्यानंतर ती पुन्हा शुद्ध होईल.
advertisement
दक्षिण भारतात द्रौपदीला कालीचा अवतार मानलं जातं, जिचा जन्म सर्व राजांचा अहंकार तोडण्यासाठी झाला होता. महाभारतात भगवान श्रीकृष्णाला मदत करण्यासाठी कालीने द्रौपदीच्या रूपात अवतार घेतला.
Location :
Delhi
First Published :
April 28, 2025 6:01 AM IST