Makar Sankranti 2025: विधीनुसार मकर संक्राती कशी साजरी करावी? सगळ्या साहित्यांची यादी पहा

Last Updated:

Makar Sankranti 2025: सूर्याच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते. संक्रातीला दान केल्यानं पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य असणे महत्त्वाचे आहे.

News18
News18
मुंबई : यंदा मकर संक्रांती मंगळवार, 14 जानेवारी रोजी आहे. मकर संक्रांतीला दुर्मीळ भौम पुष्य योग तयार होत आहे. या दिवशी सकाळी 10.17 पर्यंत पुनर्वसु नक्षत्र आहे. त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होईल. यामुळे भौम पुष्य योग निर्माण होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र स्नान करून दान करण्याची परंपरा आहे. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी.
सूर्याच्या कृपेने जीवनात सुख आणि समृद्धी येते. संक्रातीला दान केल्यानं पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांतीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्य असणे महत्त्वाचे आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया, मकर संक्रांतीला भौम पुष्य योग कधी राहील? मकर संक्रांतीसाठी पूजा साहित्य काय गरजे आहे.
मकर संक्रांती 2025 भौम पुष्य योगात -
19 वर्षांनंतर मकर संक्रांतीला दुर्मीळ भौम पुष्य योग तयार होत आहे. मंगळवारी पुष्य नक्षत्र असते, त्या दिवशी भौम पुष्य नक्षत्र योग तयार होतो. मंगळाला भौम असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सकाळी 10.17 वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर भौम पुष्य योग असेल.
advertisement
मकर संक्रांती 2025 पूजा समाग्री -
1. काळे तीळ, गूळ किंवा काळे तीळ लाडू
2. दान करायच्या अन्नपदार्थांमध्ये तांदूळ, डाळ, भाजी किंवा खिचडी, तीळ, तीळ लाडू, गूळ इत्यादींचा समावेश असावा.
3. गाईचे तूप, सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे धान्य किंवा गहू
4. तांब्याचे भांडे, लाल चंदन, लाल कापड, लाल फुले आणि फळे
advertisement
5. दिवा, धूप, कापूर, नैवेद्य, सुगंधी द्रव्ये इ.
6. सूर्य चालीसा, सूर्य आरती आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पुस्तक
मकर संक्रांती 2025 सूर्यपूजन मंत्र -
1. ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः
2. ओम ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
advertisement
मकर संक्रांतीला स्नान आणि दान केव्हा करावे?
14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 09:03 ते 10:48 या वेळेत महापुण्यकाळात स्नान करून दान करावे. काही कारणास्तव तुम्ही यावेळी स्नान-दान करू शकत नसाल, तर तुम्ही पुण्यकाल दरम्यान सकाळी 09:03 ते संध्याकाळी 05:46 दरम्यान कधीही ते करू शकता.
मकर संक्रांती 2025 चा शुभ मुहूर्त -
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05:27 ते सकाळी 06:21
advertisement
अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:09 ते 12:51
अमृतकाळ: सकाळी 07:55 ते सकाळी 09:29
विजय मुहूर्त: दुपारी 02:15 ते 02:57
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Makar Sankranti 2025: विधीनुसार मकर संक्राती कशी साजरी करावी? सगळ्या साहित्यांची यादी पहा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement