Jail yog in Kundali: खोटे आळ येतात, तरुंगात जावं लागतं! कुंडलीत असे योग जुळणं व्यक्तिसाठी धोकादायक
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Jail Yog In Kundali : तुरुंगवास म्हटलं की, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच भीती वाटते. काही लोकांच्या कुंडलीत तुरुंगात जाण्याची स्थिती असते. जन्मकुंडलीच्या लग्नाच्या भावात ग्रहांची विचित्र अवस्था असल्याने व्यक्तीला अचानक तुरुंगात जावे लागू शकते.
मुंबई : तुरुंगवास भोगायला लागावा, असं कोणालाच वाटत नसतं. प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी हवी असते. आयुष्यात तुरुंगात जाण्याची परिस्थिती उद्भवली तर भल्या-भल्यांना घाम फुटू लागतो. तुरुंगवास म्हटलं की, लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच भीती वाटते. काही लोकांच्या कुंडलीत तुरुंगात जाण्याची स्थिती असते. जन्मकुंडलीच्या लग्नाच्या भावात ग्रहांची विचित्र स्थिती असते ज्यामुळे व्यक्तीला अचानक तुरुंगात जावे लागू शकते. जाणून घेऊया, असे कोणते योग आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला तुरुंगात जावे लागते.
बंधन योग: कुंडलीतील हा एक अतिशय धोकादायक योग आहे. लग्न कुंडलीच्या दुसऱ्या, पाचव्या किंवा नवव्या घरात एखादा पीडित ग्रह असेल किंवा बाराव्या घरात आकार ग्रह असेल आणि पीडित शनि असेल तर बंधन योग तयार होतो. या योगाच्या निर्मितीमुळे व्यक्तीला तुरुंगात जाण्याची शक्यता असते. बंधन योगाने प्रभावित व्यक्ती अचानक असे काही करते ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागते.
advertisement
हे ग्रह जबाबदार : हा योग कुंडली घातक माणला जातो. जन्मकुंडलीत दुसऱ्या, पाचव्या आणि नवव्या भावात कोणताही अशुभ ग्रह किंवा बाराव्या भावात अभद्र ग्रह किंवा शनी असतो तेव्हा तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण होते. शनीच्या साडेसाती आणि धैया दरम्यान, पीडित ग्रहांच्या अशा स्थितीमुळे व्यक्ती तुरुंगात जाऊ शकते. राहू ग्रह कुंडलीत सक्रिय होतो, तेव्हा ती व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मंगळ, शनी किंवा साडेसती इत्यादींमुळे तुरुंगात जावे लागते.
advertisement
तुरुंगवास टाळण्याचे उपाय:
तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात कडक शिस्तीचे पालन केले पाहिजे. सरकारचे सर्व नियम देखील पाळले पाहिजेत, यामुळे भगवान शनिदेव प्रसन्न राहतात. तुरुंगातील योग निष्क्रिय करण्यासाठी तुम्ही दररोज हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचे पठण करावे. काळभैरवाची पूजा करावी. यामुळे बंधन योगातून मुक्तता मिळते. देवी दुर्गेची पूजा आणि प्रार्थना केल्याने जेल योग तटस्थ होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 21, 2025 1:37 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Jail yog in Kundali: खोटे आळ येतात, तरुंगात जावं लागतं! कुंडलीत असे योग जुळणं व्यक्तिसाठी धोकादायक