मौनी अमावस्येला फक्त 43 मिनिटं ठरणार महत्वाची, 'हे' एक काम करताच बदलणार नशीब, काय घडणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
18 जानेवारी 2026 रोजी माघ महिन्यातील अत्यंत पवित्र अशी 'मौनी अमावस्या' आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, ही अमावस्या वर्षातील सर्व अमावस्यांमध्ये सर्वाधिक फलदायी मानली जाते.
Mauni Amavasya 2026 : 18 जानेवारी 2026 रोजी माघ महिन्यातील अत्यंत पवित्र अशी 'मौनी अमावस्या' आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, ही अमावस्या वर्षातील सर्व अमावस्यांमध्ये सर्वाधिक फलदायी मानली जाते. यंदा या दिवशी 'सर्वार्थ सिद्धी योग' आणि 'शिववास' असा अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते, उद्या दुपारी अशा काही विशेष क्षणांची जोड मिळाली आहे, ज्यामध्ये केलेली उपासना तुमचे संपूर्ण वर्ष सुखात घालवू शकते.
मौन आणि मंत्रजपाचे 'ते' 43 मिनिटं...
उद्या दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी एक विशेष मुहूर्त सुरू होत आहे जो 3 वाजेपर्यंत असेल. या 43 मिनिटांच्या कालावधीत 'ॐ गौरी शंकराय नमः' या मंत्राचा जप करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जात आहे. मौनी अमावस्येला 'मौन' राहून केलेली साधना हजारो पटीने जास्त फळ देते. उद्याच्या या विशिष्ट वेळेत शांत राहून मनातल्या मनात मंत्रजप केल्यास शरीरातील ऊर्जा चक्रांचे संतुलन होते. ॐ गौरी शंकराय नम हा मंत्र शिव आणि शक्ती यांच्या एकरूपतेचे प्रतीक आहे. हा जप केल्याने केवळ वैवाहिक सुखच नाही, तर आर्थिक आणि मानसिक अडचणींतूनही कायमची सुटका मिळते, अशी मान्यता आहे.
advertisement
काय होईल या मंत्रजपामुळे?
1. संकटातून मुक्ती: जर तुम्ही या 43 मिनिटांत मौन राहून जप केलात, तर तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे मार्गी लागतील आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून तुमचे रक्षण होईल.
2. सुख-समृद्धी: 'गौरी-शंकर' हे गृहस्थाश्रमाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या मंत्रामुळे घरात लक्ष्मीचा वास स्थिर होतो आणि वर्षभर पैशांची चणचण भासत नाही. 3. कौटुंबिक शांतता: पती-पत्नीमधील वाद किंवा घरातील कटकटी दूर होऊन नात्यात गोडवा निर्माण होतो.
advertisement
4. पितृदोषाचे निवारण: अमावस्येला केलेल्या या साधनेमुळे पितृ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
5. नकारात्मकतेचा नाश: घरामध्ये किंवा मनात असलेली भीती, नैराश्य आणि नकारात्मक ऊर्जा या मंत्राच्या लहरींनी नष्ट होते.
6. मानसिक बळ: वरील 43 मिनिटे स्वतःच्या मनावर ताबा मिळवून केलेली साधना तुम्हाला भविष्यातील संकटांशी लढण्यासाठी प्रचंड मानसिक शक्ती देते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 7:26 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
मौनी अमावस्येला फक्त 43 मिनिटं ठरणार महत्वाची, 'हे' एक काम करताच बदलणार नशीब, काय घडणार?








