Astrology: पंचग्रही योग.. तोही मौनी अमावस्येला! तूळसहित 5 राशीच्या लोकांचे जबरदस्त लक; चौफेर डंका
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mauni Amavasya 2026 Lucky Rashifal: ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा-अमावस्येला विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्येला या वेळी शनिदेवाची राशी असलेल्या मकर राशीत पाच ग्रहांची युती होत असून 'पंचग्रही योग' निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा योग अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मीळ मानला जातो.
advertisement
मेष - या योगामुळे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये नवीन विचार आणि उत्साह वाढेल. उच्च शिक्षण किंवा परदेश प्रवासाचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयांच्या दिशेने धाडसी पाऊल उचलण्यास सक्षम असाल. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तसेच वडील किंवा गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मोठे फायदे होतील.
advertisement
advertisement
advertisement
धनु - धनु राशीच्या व्यक्तींची अनेक जुन्या वादातून सुटका होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे गोड फळ मिळेल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असाल, तर या काळात तुम्हाला दिलासा मिळेल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि चांगले परिणाम मिळतील.
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ संपत्ती, व्यवसाय आणि करिअरमध्ये वाढ करणारा ठरेल. तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. हा योग तुम्हाला स्पर्धकांपेक्षा पुढे नेण्यास मदत करेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील आणि उत्पन्नात वाढ होईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










