प्रेमानंद महाराजांची प्रकृती पुन्हा बिघडली; आश्रमातून आली मोठी अपडेट, आता भाविकांना आता रात्री 2 वाजता दर्शन घेता येणार नाही
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Premanand Maharaj Health Update: प्रेमानंद महाराज याचे पहाटे २ वाजता पदयात्रा करत भक्तांना दर्शन देताना दिसणार नाहीत. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे पदयात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे.
नवी दिल्ली: वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आता पहाटे २ वाजता पदयात्रा करत भक्तांना दर्शन देताना दिसणार नाहीत. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांची पदयात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. प्रेमानंद महाराजांच्या प्रकृती माहिती त्यांच्या शिष्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. गेल्या महिन्यात प्रेमानंद महाराज यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, त्यामुळे त्यांनी पुन्हा पदयात्रा सुरू केली होती. मात्र आता पदयात्रा पुन्हा बंद करण्यात आली आहे.
प्रेमानंद महाराज वृंदावनमधील आपल्या निवासस्थानातून पहाटे २ वाजता पदयात्रा करत श्री हित राधा केली कुंज येथे जात असतात. या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लाखो भक्त उभे राहून त्यांच्या दर्शनाची प्रतीक्षा करत असत. भक्तसंख्येत सतत वाढ होत होती आणि हीच वाढलेली गर्दी देखील पदयात्रा थांबवण्याचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. 'भजनमार्ग ऑफिशियल' या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे. या पोस्टनंतर भक्त प्रेमानंद महाराज यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
advertisement
संत प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडन्या अनेक वर्षांपूर्वी निकामी झाल्या असून ते सध्या डायलिसिसवर आहेत. एका भक्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना किडनीच्या समस्येमुळे जास्त पाणी पिण्याचीही परवानगी नाही. डॉक्टर प्रत्येक आठवड्यात त्यांचे डायलिसिस करतात आणि आवश्यक उपचार देतात. प्रेमानंद महाराज यांना भेटण्यासाठी लाखो भक्त वृंदावनमध्ये पोहोचतात आणि रात्रीपासूनच रस्त्याच्या कडेला उभे राहून त्यांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहतात. मात्र, आता भक्तांना त्यांच्या पदयात्रेत दर्शन घेता येणार नाही.
advertisement
advertisement
प्रेमानंद महाराज ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार अनुवांशिक असतो आणि यात किडनीचा आकार सामान्यपेक्षा मोठा होतो. त्यामुळे किडनीमध्ये पाणी साचत जाते आणि कालांतराने किडनी कार्य करणे थांबवते. प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडन्या गेल्या १९ वर्षांपासून निकामी झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद असतो. त्यांच्या आजाराबद्दल माहिती असूनही भक्तांना यावर विश्वास बसत नाही, कारण त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व पाहून कुणालाही वाटत नाही की, ते कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 06, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
प्रेमानंद महाराजांची प्रकृती पुन्हा बिघडली; आश्रमातून आली मोठी अपडेट, आता भाविकांना आता रात्री 2 वाजता दर्शन घेता येणार नाही