Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा चंद्र आज वाट पहायला लावणार! विजय मुहूर्तावरील गणेश पूजा शुभ फळदायी

Last Updated:

Sankashti Chaturthi 2025 Today: नारद पुराणानुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. या व्रतामुळे आजार, अडचणी, आर्थिक संकट इत्यादींपासून सुटका मिळते.

News18
News18
मुंबई : आज देशभरात संकष्टी चतुर्थीचा सण साजरा केला जात आहे. विघ्नांचा नाश करणाऱ्या श्री गणेशाची आज घरोघरी विधिवत पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास केल्यानं सर्व अडचणी, संकटे दूर होतात. श्री गणेशाच्या आशीर्वादाने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. संकष्टी चतुर्थीचा पूजा मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदय जाणून घेऊया.
advertisement
नारद पुराणानुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. या व्रतामुळे आजार, अडचणी, आर्थिक संकट इत्यादींपासून सुटका मिळते. घरात आणि कुटुंबात आनंद, शांती आणि सौभाग्य लाभते. या दिवशी उपवास करून रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि पुण्यफळ मिळते. श्री गणेश हे सद्गुण आणि बुद्धीचे प्रतीक आहेत. त्यांची पूजा केल्याने बुद्धी आणि समज विकसित होते आणि जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.
advertisement
संकष्टी चतुर्थी 2025 पूजा मुहूर्त -  संकष्टी चतुर्थीच्या पूजेसाठी पहाटे ब्रह्म मुहूर्ताचा सर्वोत्तम वेळ 04:26 ते 05:11 पर्यंत आहे. याशिवाय, दुपारी 02:31 ते 03:22 पर्यंत विजय मुहूर्त असेल. संध्याकाळी 06:20 ते 08:06 ही वेळ संध्याकाळच्या पूजेसाठी चांगली आहे, ही वेळ अमृत काळाची असेल. संकष्टी चतुर्थीला आज सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग दिवसभर राहील.
advertisement
संकष्टी चतुर्थी 2025 पूजा विधी - सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि ध्यान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करा.
- घरातील पूजेचे ठिकाण स्वच्छ करा, नंतर चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड अंथरा आणि गणपतीचा फोटो/मूर्ती स्थापित करा.
- मूर्तीसोबत एक अखंड सुपारी ठेवा आणि तिची गणपतीच्या रूपात पूजा करा.
advertisement
- गणपतीला पंचामृताने स्नान घाला आणि गंगाजलने स्वच्छ करा. यानंतर अष्टगंध, अख्खे तांदूळ, चंदन, फळे, फुले, दुर्वा इत्यादी पूजेसाठी अर्पण करा.
- तुपाचा दिवा आणि कापूर लावून गणपतीची आरती करा आणि गणेश चालीसा पठण करा.
- रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला जल अर्पण करा. दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत सोडा.
चंद्रोदयाची वेळ या संकष्टीला रात्री उशिराची असेल. आज रात्री 9.42 वाजल्यापासून चंद्र दिसू लागेल. चंद्राला जल अर्पण करण्यासाठी एका भांड्यात पाणी, गंगाजल, पांढरी फुले आणि थोडे दूध मिसळा नंतर चंद्राला नमस्कार करून अर्घ्य द्यावे.
advertisement
सुखकर्ता-दुख:हर्तानंतर गणपतीची ही आरती म्हणावी -
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
एक दंत दयावंत, चार भुजा धारी।
माथे सिंदूर सोहे, मूसे की सवारी॥
advertisement
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
पान चढ़े फल चढ़े, और चढ़े मेवा।
लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
अंधन को आंख देत, कोढ़िन को काया।
बांझन को पुत्र देत, निर्धन को माया॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
'सूर' श्याम शरण आए, सफल कीजे सेवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
दीनन की लाज रखो, शंभु सुतकारी।
कामना को पूर्ण करो, जाऊं बलिहारी॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती, पिता महादेवा॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा चंद्र आज वाट पहायला लावणार! विजय मुहूर्तावरील गणेश पूजा शुभ फळदायी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement