advertisement

Sankashti Chaturthi: डिसेंबरच्या शेवटी संकष्टी चतुर्थीचं व्रत; पहा शुभ मुहूर्त, पूजा विधी, धार्मिक महत्त्व

Last Updated:

Sankashti Chaturthi : संकष्टीला गणेशाची पूजा केल्यानं कार्यात यश मिळतं. या दिवशी देवांचा देव महादेवाचा पुत्र गणपतीची मनोभावे पूजा करून उपवास केल्यास उत्पन्नात वाढ होईल आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात, असे मानले जाते.

News18
News18
मुंबई, 27 डिसेंबर : या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी हे व्रत साजरं केलं जाईल. संकष्टीला गणेशाची पूजा केल्यानं कार्यात यश मिळतं. या दिवशी देवांचा देव महादेवाचा पुत्र गणपतीची मनोभावे पूजा करून उपवास केल्यास उत्पन्नात वाढ होईल आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात, असे मानले जाते. जाणून घेऊ संकष्टी चतुर्थीला आपण कशी पूजा करावी.
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. संकष्टी तिथी 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.43 पासून सुरू होईल आणि 31 डिसेंबर रोजी सकाळी 11.55 पर्यंत असेल. संकष्टीला चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो.
संकष्टीची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून गणेशाला नमस्कार करावा. त्यानंतर घराची बाहेरील बाजू स्वच्छ करा आणि घराच्या काना-कोपऱ्यात गंगाजल शिंपडावे.
advertisement
सकाळची नित्य कामे, आंघोळ करून झाल्यावर पिवळे कपडे घाला. शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे घालावे. त्यानंतर देव्हाऱ्यात चौरंगावर स्वच्छ पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करा.
श्रीगणेशाच्या मूर्तीसमोर बसून उजव्या तळहातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प करा. पंचोपचार करून पूर्ण विधीपूर्वक श्रीगणेशाची पूजा करावी. पूजेत गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा.
advertisement
त्यानंतर उदबत्ती आणि दिवा लावा आणि गणेश चालीसा पठण करा. गणपतीची आरती करून पूजेची सांगता करा. पूजेनंतर, देवाला मनापासून प्रार्थना करा आणि मनोकामना व्यक्त करा. अशा प्रकारे पूजा पूर्ण होईल.
दिवसभर उपवास ठेवा आणि संध्याकाळी संध्याआरती करा आणि चंद्रदेवाचे दर्शन घ्या. दिवसभर फक्त फलाहार करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. अशा प्रकारे तुमची संकष्टीची पूजा आणि व्रत पूर्ण होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Sankashti Chaturthi: डिसेंबरच्या शेवटी संकष्टी चतुर्थीचं व्रत; पहा शुभ मुहूर्त, पूजा विधी, धार्मिक महत्त्व
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement