स्वप्नात सर्पदंश होणं, सापाने फणा काढणं, हे अत्यंत शुभ संकेत असतात; अजिबात घाबरू नये...

Last Updated:

सापाला ज्योतिषशास्त्रात 'काळ' म्हणतात. म्हणजेच तो स्वप्नात दिसणं हा आपल्या मृत्यूचा संकेत असतो. तर, याउलट सापाला पितृसुद्धा म्हणतात. त्यामुळे त्याचं स्वप्न पडण्याचा अर्थ हा आपल्या आयुष्यात धनाचं आगमन होणार आहे, असाही होतो.

तुमची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे असं समजून जा.
तुमची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे असं समजून जा.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर : झोपेत स्वप्न पडणं ही अगदी सामान्य बाब आहे. काही स्वप्न सुखावणारी असतात, तर काही स्वप्न धडकी भरवणारी असतात. अनेकदा आपल्याला स्वप्नात साप दिसतो आणि आपली झोपच उडते. मग आजूबाजूचा बिछानाही आपल्याला सापच वाटू लागतो. तुम्हाला माहितीये का, प्रत्येक स्वप्नामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मग अशाप्रकारे साप दिसण्यामागे नेमका काय अर्थ असेल बरं? सविस्तरपणे जाणून घेऊया.
advertisement
साप हा सर्वात विषारी प्राणी मानला जातो, त्यामुळे त्याला बघून कितीही धाडसी व्यक्ती असली तरी ती दचकतेच. म्हणजेच स्वप्नात साप दिसण्याचा अर्थही अशुभ होतो. आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडणार आहे, याचा हा संकेत असतो. सापाला ज्योतिषशास्त्रात 'काळ' म्हणतात. म्हणजेच तो स्वप्नात दिसणं हा आपल्या मृत्यूचा संकेत असतो. तर, याउलट सापाला पितृसुद्धा म्हणतात. त्यामुळे त्याचं स्वप्न पडण्याचा अर्थ हा आपल्या आयुष्यात धनाचं आगमन होणार आहे, असाही होतो. मग हा नेमका फरक ओळखायचा कसा?
advertisement
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप दिसणं म्हणजे त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडणार असतं. परंतु यात चांगली बाब अशी आहे की, संकेत मिळाल्याने आपण कोणत्याही वाईट प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी तयार राहतो.
advertisement
सर्पदंश झाल्यास...
स्वप्नात जर सापाने आपल्याला दंश केला आणि आपली झोपमोड झाली तर हा अत्यंत शुभ संकेत असतो. याचा अर्थ आहे की आता आपला चांगला काळ सुरू होणार आहे.
स्वप्नात साप मागे आणि तुम्ही पुढे धावत असलात तर...
हा अत्यंत अशुभ संकेत असतो. याचा अर्थ आहे की, तुमच्या पूर्ण कुटुंबावर अडचण येणार आहे.
advertisement
साप आणि मुगुसाचं भांडण दिसलं तर...
याचा अर्थ असतो की, येत्या काळात तुम्ही एखाद्या भयंकर वादात अडकणार आहात. अगदी कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या पाठीशी लागू शकतात.
काळ्या सापाने फणा काढला तर...
हा शुभ संकेत असतो. असं स्वप्न पडलं तर येत्या काळात तुमची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे असं समजून जा. तसंच आयुष्यात आनंद येणार हे या स्वप्नामुळे निश्चित होतं.
advertisement
सतत सापाचे स्वप्न पडणं...
जर तुम्हाला एकामागून एक सतत सापाची स्वप्न पडू लागली तर हा एक गंभीर संकेत असतो. अशी स्वप्न पडल्यास आपल्या कुंडलीत पितृदोष किंवा कालसर्प दोष निर्माण झालाय हे समजून जा आणि लवकरात लवकर या दोषांवर उपाय करा. नाहीतर खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
स्वप्नात सर्पदंश होणं, सापाने फणा काढणं, हे अत्यंत शुभ संकेत असतात; अजिबात घाबरू नये...
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement