यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण ‘या’ दिवशी, गरोदर स्त्रियांनी घ्यावी काळजी

Last Updated:

सूर्यग्रहणाचा लोकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्थितीवर परिणाम होतो. काही ठिकाणी ग्रहणाचा काळ अशुभ समजला जातो. त्यामुळे गरोदर स्त्रियांना या काळात थोडी काळजी घ्यावी लागते.

सूर्यग्रहण
सूर्यग्रहण
मुंबई : खगोलशास्त्राच्या दृष्टिने सूर्यग्रहण पाहायला मिळणं ही पर्वणी असते. अनेकजण या संधीचा लाभ घेतात. 14 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. असं असलं तरी सूर्यग्रहणाचा लोकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक स्थितीवर परिणाम होतो. काही ठिकाणी ग्रहणाचा काळ अशुभ समजला जातो. त्यामुळे गरोदर स्त्रियांना या काळात थोडी काळजी घ्यावी लागते.
यंदाच्या वर्षातलं दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण अश्विन अमावस्येला होणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. 14 ऑक्टोबरला होणारं हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. मात्र भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.34 मिनिटांनी ग्रहण लागेल व मध्यरात्री 2.25 मिनिटांनी सुटेल. ग्रहण भारतातून दिसणार नसलं, तरी त्यामुळे ग्रहांच्या स्थानात काही बदल होतात, तसंच सूर्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते.
advertisement
ती काही काळ खंडित झाल्यामुळे पृथ्वीवर, जीवसृष्टीवर त्याचे परिणाम दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या काळात गरोदर स्त्रियांनी जास्त काळजी घ्यायची असते. काही ठिकाणी सूर्यग्रहण अशुभ समजलं जातं. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी ग्रहणकाळात घरातच राहावं असं म्हणतात. कारण ग्रहणाच्या काळात सूर्याकडून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. त्याचा आई व बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. गरोदर स्त्रियांनी ग्रहण पाहू नये असंही सांगितलं जातं. तसंच या काळात मन शांत ठेवून पचायला हलक्या अन्नाचं सेवन करावं. ग्रहणकाळात झोपू नये व पाणी भरपूर प्यावं असा सल्ला दिला जातो.
advertisement
ग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी वेगळा चष्मा मिळतो. ग्रहणाबाबत भारतात अनेक समज-गैरसमज आहेत. काही जण ग्रहणाला अशुभ मानतात. त्या काळात कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. तसंच ग्रहणाच्या काळात अन्न खाऊ नये व शक्यतो पाणीही पिऊ नये असा समज आहे. ग्रहणकाळात सूर्याकडून येणारी किरणं आरोग्यासाठी हानीकारक असतात, त्यामुळे ग्रहणाबाबत नियम पाळावेत असं आपल्याकडे सांगितलं जातं.
advertisement
2023 मध्ये एकूण 4 ग्रहणं आहेत. त्यापैकी 2 सूर्यग्रहणं, तर 2 चंद्रग्रहणं आहेत. या आधी एप्रिल महिन्यात झालेलं सूर्यग्रहण भारतातून दिसलं होतं. ते काही काळ कंकणाकृती व नंतर खग्रास अशा स्वरूपाचं होतं. मात्र ऑक्टोबर महिन्यात होणारं दुसरं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. उत्तर अमेरिका, कॅनडा यांसह आणखी काही देशांमधून हे ग्रहण पाहता येणार आहे. भारतातून दिसणार नसल्यानं या ग्रहणाचे नियम भारतात लागू होणार नाहीत.
advertisement
नोट : ही माहिती सामान्य माहितीव आधारीत असून न्यूज18 याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत फक्त माहिती पोहोचवणे हा आहे. न्यूज18 मराठी या माहितीची कोणतीही खातरजमा करत नाही.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
यंदाच्या वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण ‘या’ दिवशी, गरोदर स्त्रियांनी घ्यावी काळजी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement