Surya grahan 2023 : कधी आहे या वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण? सूतक काळ नोंदवून घ्या!

Last Updated:

असं मानलं जातं की, ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही.

News18
News18
नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासारख्या खगोलीय घटना नेहमीच आपल्या मनात आकर्षण आणि कुतूहल निर्माण करतात. ग्रहणाच्या घटनेला ज्योतिषशास्त्रात आणि खगोलशास्त्रात सारखंच महत्त्व दिलं जातं. धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. त्यामुळे असं मानलं जातं की, ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही.
पण, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा नक्कीच वाईट परिणाम होतो. पंडित आशिष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मधील दुसरं सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर (शनिवार) रोजी होणार आहे. या ग्रहणाचा सूतक कालावधी, ग्रहणाचा प्रकार आणि ग्रहणाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजून 34 मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होईल आणि 2 वाजून 25 मिनिटांनी संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे भारतात कोणताही सूतक कालावधी वैध राहणार नाही. हे सूर्यग्रहण सर्व 12 राशींवर परिणाम करेल. हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा, ग्वाटेमाला, मेक्सिको, अर्जेंटिना, कोलंबिया, क्युबा, बार्बाडोस, पेरू, उरुग्वे, अँटिग्वा आणि इतर देशांमध्ये दिसणार आहे.
advertisement
हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने भारतात सूतक कालावधी पाळण्याची गरज नाही. सूतक काळ हा असा काळ आहे जेव्हा कोणत्याही प्रकारची पूजा केली जात नाही. या काळात विवाह किंवा पूजा इत्यादी विशेष कार्ये केली जात नाहीत. ग्रहण काळात बरेच लोक काही खात नाहीत किंवा पीतही नाहीत. ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी घरातच थांबावं नाहीतर त्यांच्या बाळावर अशुभ प्रभाव पडतो, असं मानलं जातं. जेव्हा ग्रहण दिसतं तेव्हाच सूतक कालावधी वैध असतो.
advertisement
सूर्य ग्रहणाचं महत्त्व
ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यासारख्या घटना महत्त्वाच्या मानल्या जातात. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधून चंद्र जातो तेव्हा सूर्यग्रहण होतं. चंद्राच्या अडथळ्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही आणि आपण ही स्थिती सूर्यग्रहण म्हणून पाहतो. सूर्यग्रहणाच्या काळात चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. जर चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसला तर खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जर चंद्रामुळे सूर्याचा फक्त काही व्यापला गेला असेल तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. 14 ऑक्टोबरला होणारं सूर्यग्रहण हे कंकणाकृती असेल. ज्यामध्ये चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकणार नाही आणि सूर्याचा बाह्य भाग कंकणासारखा दिसेल.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Surya grahan 2023 : कधी आहे या वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण? सूतक काळ नोंदवून घ्या!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement