Ashadhi Ekadashi 2025: साईबाबांच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती मूर्ती, शिर्डीतील विठ्ठल मंदिराचा अनोखा इतिहास, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
Ashadi Ekadashi 2025: आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिर्डी येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती साईबाबांच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती.
अहिल्यानगर: आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिर्डी येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती साईबाबांच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती. तसेच साई भक्त दासगणू यांनी याच मंदिरात शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर ही आरती लिहिली अशी मान्यता आहे. नेमकं काय आहे यामूर्ती मागचा इतिहास? याबद्दलच ज्योतिषी निलखे गुरु यांनी माहिती दिली आहे.
शिर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर या मंदिरातील विठ्ठल मूर्तीचा इतिहास हा असा आहे की या मंदिरातील विठ्ठल मूर्ती साईबाबांनी त्यांच्या हस्ते स्थापन केलीली आहे. साईबाबांचे श्रद्धास्थान असणारे हे मंदिर याच मंदिरात शिर्डी माझे पंढरपूर या प्रसिद्ध आरतीची निर्मिती साईभक्त दासगणू महाराजांनी या मंदिरात केली अशी मान्यता आहे.
advertisement
तसेच शिर्डीतील लक्ष्मण मामा रत्नपारखी हे साई विठ्ठल भक्त होते. एकदा साईबाबांनी त्यांना पंढरपूरची वारी करण्याचा सल्ला दिला. ते पंढरपूरला गेले असता चंद्रभागे स्नान करत असताना त्यांच्या पायाला काहीतरी गुळगुळीत स्पर्श झाला. त्यांनी बुडी मारून पाहिले तर विठ्ठलाची घोटीव पाषाणाची मूर्ती होती ती मूर्ती त्यांनी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला मात्र जड असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही आणि ते तसेच शिर्डीत परतले.
advertisement
पण ते जसजशी शिर्डी गावाच्या वेशीजवळ येत गेले तसे तसे त्यांना अंधूक दिसू लागले. गावात आल्यावर ते द्वारकामाई साईबाबांच्या दर्शनासाठी गेले ते गेले त्यावेळेस बाबांनी त्यांना विचारले की रिकाम्या हाती का आलास? आल्या पावलांनी माघारी जा आणि विठ्ठलांना घेऊन ये, त्यावर ते म्हणाले की मूर्ती खूप जड आहे मला उचलता येत नाही. यावर बाबांनी सांगितले तिथे जा आणि माझे स्मरण कर मग बघ जड नाही लागणार. हे ऐकताच लक्ष्मण मामा पंढरपूरला गेले यावेळी त्यांना मूर्ती जड लागली नाही आणि मूर्ती ते शिर्डीत घेऊन आले.
advertisement
मग या मूर्तीची स्थापना करण्यात आली. नंतर या मंदिरातील रुक्मिणीमूर्ती संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या मूर्ती दासगणू महाराज यांच्या सांगण्यावरून बसवण्यात आल्याची माहिती आहे, ज्योतिषी निलखे गुरु सांगतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 06, 2025 2:24 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
Ashadhi Ekadashi 2025: साईबाबांच्या हस्ते स्थापन करण्यात आली होती मूर्ती, शिर्डीतील विठ्ठल मंदिराचा अनोखा इतिहास, Video