108 परिक्रमांनी होते इच्छापूर्ती, महाराष्ट्रातील हे गणेश मंदिर माहितीये का?
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
विदर्भात गणपतीचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्यास इच्छित फळ मिळते, असा भक्तांचा समज आहे.
वर्धा, 24 सप्टेंबर: गणपतीच्या आगमनानंतर वातावरणात नवचैतन्य निर्माण होत असतं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता हजारो भक्तांची पावलं वेगवेगळ्या मंदिरांकडे वळतात. भारताच्या कानाकोपऱ्यात श्री गणेशाची प्राचीन इतिहास असलेली अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातही असेच एक प्राचीन मंदिर आहे. इथे 108 प्रदक्षिणा घातल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची धारणा आहे.
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात गणपती वार्डमध्ये असलेल्या गणपती मंदिराचा इतिहास तब्बल 207 वर्ष जुना आहे. तेव्हाच्या काळात या भागामध्ये तूप आणि लोण्याची मोठी बाजारपेठ होती. दुग्ध व्यावसायिक आपलं तूप आणि लोणी विकण्यासाठी या बाजारपेठेत यायचे. त्यांच्याजवळ असलेलं तूप, लोणी प्रथम गणपतीची सोंड आणि चरणावर अर्पण करायचे, असे येथील भाविक सांगतात. विशेष म्हणजे 207 वर्ष जुन्या गणपती मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे.
advertisement
प्रदक्षिणा घातल्याने मनोकामना पूर्ण
या मंदिरातील मूर्तीवर शेंदूर आणि तुपाचा मिश्रण केलेला लेप लावला जातो. तसेच गुळाचा नैवेद्य दाखवून दुर्वा वाहिल्या जातात. असं म्हणतात की गणपतीला शेंदुराचा लेप आणि दुर्वा प्रिय आहेत. तर गुळ अतिप्रिय आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे ही परंपरा या ठिकाणी कायम आहे. गणपती मूर्तीच्या तीन परिक्रमा आणि एक महिना या गणपती मंदिराच्या 108 परिक्रमा मनोभावे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही भक्त सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
First Published :
September 24, 2023 5:58 PM IST