महाराष्ट्रातील या ठिकाणी विहिरीत आहे राजवाडा, 'छत्रपतीं'च्या गुप्त बैठका होणारी वास्तू पाहिलीत का? Video

Last Updated:

ऐतिहासिक विहिरीला वरून पाहिल्यास शिवलिंगाच्या आकाराची विहीर दिसते. तर पुढच्या बाजूने पाहिल्यास अष्टकोनी आकाराची विहीर दिसते.

+
महाराष्ट्रातील

महाराष्ट्रातील या ठिकाणी विहिरीत आहे राजवाडा, 'छत्रपतीं'च्या गुप्त बैठका होणारी वास्तू पाहिलीत का? Video

शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: महाराष्ट्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक वास्तू आहेत. सातारा हे एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर होतं. या जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा असून इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा विविध ठिकाणी आढळतात. सातारा तालुक्यातील लिंब येथे एक पुरातन विहीर असून 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद असणाऱ्या विहिरीला 12 मोटीची विहीर म्हणूनच ओळखले जाते.. विशेष म्हणजे ही साधीसुधी विहीर नसून या विहिरीत एक राजवाडा आहे. छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आल्याचे अनेक संदर्भ आढळतात.
advertisement
साताऱ्यातील लिंबच्या शेरी येथे ऐतिहासिक 12 मोटेची विहीर आहे. ही विहीर म्हणजे शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना मानला जातो. या विहिरीत प्रशस्त महाल देखील आहे. 1641 ते 1645 दरम्यान ही विहीर बांधल्याचे सांगितले जाते. लिंब येथील विहिरीला 12 मोटेची विहीर म्हणून ओळखले जात असले तरी विहिरीला 15 मोटी आहेत.परंतु, यातील 12 मोटी वापरात असल्याने 12 मोटेची विहीर म्हणूनच ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. विहिरीत एक शिलालेख असून त्यावर माहिती आहे. विशेष म्हणजे या विहिरीचे पाणी कितीही दुष्काळ पडला तरी कमी होत नाही, असे दिखील सांगण्यात येते.
advertisement
दोन टप्प्यात विहीर
लिंब येथील विहीर दोन टप्प्यात आहे. पहिला टप्पा जात असताना 28 पायऱ्या उतराव्या लागतात. 28 पायऱ्या उतरल्यानंतर विहिरीच्या पहिल्या टप्प्याला उपविहीर किंवा आड असे देखील म्हणतात. आपण 'इकडे आड तिकडे विहीर' ही म्हण ऐकली असेल. या विहिरीकडे पाहून या म्हणीची प्रचिती येते. या विहिरीचा पहिला टप्पा म्हणजे आड आणि दुसरा टप्पा म्हणजे विहिरीचा मुख्य भाग आहे.
advertisement
पहिल्या टप्प्यात काय?
आडाच्या पहिल्या टप्प्यात 6 मोटी आहेत. पूर्वीच्या काळात सहा मधील 3 चालू होत्या. दोन पूर्व बाजूच्या आणि एक पश्चिम बाजूची आहे. आडाची खोली 35 फूट असून उत्तर बाजूला दोन शिल्प आहेत. त्या शिल्पाला व्याल असे म्हणतात. असेच हुबेहूब शिल्प रायगडावर देखील आहे. शरीर सिंहाचे आणि तोंड वाघाचे असल्याने साहित्यात मांडणी करताना हे शिल्प शौर्याचे प्रतीक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
advertisement
12 नाही 15 मोटेची विहीर
मुख्य विहिरीला 9 मोटी आहेत आणि आडाला 6 मोटी आहेत. एकूण 15 मोटीची विहीर आहे, मात्र पूर्वीच्या काळात 12 मोटी सुरू असल्याने या विहिरीला 12 मोटीची विहीर म्हटले जाते. या विहिरीचे पाणी बैलाच्या साह्याने काढण्यात येत असे. शिवकालीन स्थापत्य शास्त्राचं एक अदभुत उदाहरण म्हणजे ही शेरी लिंब गावची बारा मोटेची विहीर आहे. या विहिरीकडे पाहिल्यावर ही विहीर आहे की राजवाडा असा प्रश्न पडतो असतो.
advertisement
विहीर की राजवाडा?
या विहिरीच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी आणि आड असल्याने ही अत्यंत सुंदर वास्तू नेमकी कशा पद्धतीने बांधली असेल याचे कोडे अजून देखील सुटले नाही. या विहिरीला वरून पाहिल्यास साधारणता शिवलिंगाच्या आकाराची विहीर दिसते. त्याच बरोबर या विहिरीला पुढच्या बाजूने पाहिल्यास अष्टकोनी आकाराची विहीर दिसते. विहिरीच्या आतील बाजूस चार शिल्पे आहेत. त्या शिल्पाला शरब असे म्हटले जाते. शरब प्राणी हा अतिशय रागीट प्राणी म्हणून ओळखला जातो.
advertisement
मुख्य विहिरीच्या वरच्या बाजूस एक जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा देखील आहेत. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती असणारा आड आहे . या दोन्ही विहिरींच्या मध्ये आलिशान असा राजवाडा आहे. या राजवाडाच्या मध्यभागी चार खांब आहेत. प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र आहे. दुसऱ्या खांबाला हत्ती, घोडे, श्रीकृष्ण राधा, तर एका बाजूला प्रभू राम, लक्ष्मण, सीता यांचे शिल्प कोरलेले आहे. त्यावरील बाजूस कोरीव फुलांचे नक्षीकाम केलेले आहे.
छत्रपती शाहू महाराजांची सदर
विहिरीच्या वरच्या बाजूस एक सिंहासन आहे आणि त्याच्या समोर सभेसाठी बैठक व्यवस्था म्हणजे सदर केलेली आहे. स्वराज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे सिंहासन याठिकाणी आहे. शाहू महाराजांच्या गुप्त बैठका, डावपेच या विहिरीतील गुप्त महालात होत असत. तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकाऱ्यांशी, विहिरीचे कामगारांचे आणि आपल्या सैन्याशी ते संवाद साधत असत, असे लिंब शेरी ग्रामस्थ सांगतात. या विहिरीला पाहण्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून पर्यटक येत असतात.
view comments
मराठी बातम्या/Temples/
महाराष्ट्रातील या ठिकाणी विहिरीत आहे राजवाडा, 'छत्रपतीं'च्या गुप्त बैठका होणारी वास्तू पाहिलीत का? Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement