Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला पूर्वजांसाठी करतात या 4 गोष्टी, पितृदोष होणारच नाही
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया ही एक विशेष तिथी आहे, ज्यात पितरांसाठी कार्य करण्याची परंपरा आहे. सोम प्रदोष, पितृ अमावस्या, अक्षय्य तृतीया इत्यादी काही तिथींना पूर्वजांचे पूजन-कार्य केल्यानं देवता प्रसन्न होतात, असे मानले जाते.
मुंबई : अक्षय्य तृतीया ही तिथी हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी हिंदू धर्मात सर्व शुभ कार्ये होतात. अक्षय्य तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. आज 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतिया साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेला पूजेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.
हिंदू धर्मात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेला कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केल्यानं त्याचे फळ अक्षय्यच असते, असे मानले जाते. म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य अक्षय्य राहते, जे कधीही कमी होत नाही. अक्षय्य तृतीयेला हिंदू धर्माचे लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, अक्षय्य तृतीयेला शुभ मुहूर्त न पाहता लग्न किंवा नवीन वास्तु-दुकान उद्घाटन, जमीन खरेदी करणे, नवीन नोकरीत रुजू होणे, यासारखी इतर कामे करणे खूप शुभ मानले जाते.
advertisement
ज्योतिषाचार्यांच्या मते, अक्षय्य तृतीयेला पूर्वजांसाठी ध्यान आणि दान केल्यानं मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, अक्षय्य तृतीयेला गुरू ग्रह अस्त असो वा उगवत असो, या काळात पूर्वजांसाठी दान, पूजा, जप इत्यादी केल्याने माणसाला हजारपट चांगले फळ मिळते. याविषयीचे वर्णन अनेक धार्मिक ग्रंथ-पुस्तकांमध्ये आहे. अक्षय्य तृतीया ही एक विशेष तिथी आहे, ज्यात पितरांसाठी कार्य करण्याची परंपरा आहे. सोम प्रदोष, पितृ अमावस्या, अक्षय्य तृतीया इत्यादी काही तिथींना पूर्वजांचे पूजन-कार्य केल्यानं देवता प्रसन्न होतात, असे मानले जाते. या काळात पितरांचा जप, तपस्या, दान, उपासना इत्यादी केल्याने माणसाला स्वर्गात स्थान मिळते, असे मानले जाते.
advertisement
अक्षय्य तृतीयेला केलेले पुण्य कार्य निष्फळ होत नाही किंवा नष्ट होत नाही, त्याचे फळ इतर ऐहिक सुखांसह हजार पटीने वाढते, म्हणून याला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य तृतीयेला केलेल्या शुभ कार्याचे फळ या जन्मात तसेच पुढील जन्मात मिळते, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
अक्षय्य तृतीयेला केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे हजार पटीने फळ मिळते. अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं धनाचा वर्षाव होतो. दुसरीकडे, अक्षय्य तृतीयेला देवाची पूजा आणि ध्यान केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2024 8:06 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला पूर्वजांसाठी करतात या 4 गोष्टी, पितृदोष होणारच नाही