Diwali 2023 : लक्ष्मीप्राप्तीसाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती, का नष्ट होते मनुष्याची संपत्ती

Last Updated:

पैसा आल्यावर जे अहंकारी होतात, संपत्तीचा माज दाखवतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो. ही चूक श्रीमंतांनाही गरीब करते. अशा लोकांना लक्ष्मी शिक्षा देते.

एखाद्या व्यक्तीची छोटीशी चूक देवी लक्ष्मीच्या नाराजीचे कारण बनते
एखाद्या व्यक्तीची छोटीशी चूक देवी लक्ष्मीच्या नाराजीचे कारण बनते
मुंबई:  चाणक्य नीतीनुसार जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. चाणक्य म्हणतात की, एखाद्या व्यक्तीची छोटीशी चूक देवी लक्ष्मीच्या नाराजीचे कारण बनते. यामुळे या गोष्टींचा खोलवर विचार केला पाहिजे. चाणक्य नीतीत सांगितले आहे की, ज्यांना वेळ आणि पैसा महत्त्वाचा असतो त्यांनाच यश मिळते. जे आपले ध्येय साध्य करण्यात निष्काळजीपणा करतात किंवा अवाजवी खर्च करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो.
पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. जे लोक पैशाचा घमेंड आणि रागात वापर करतात, त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येते. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीही आपला आशीर्वाद वाया घालवत नाही. चाणक्याच्या मते, जेव्हा माणूस धन मिळविण्याच्या लालसेने इतरांचे नुकसान करतो. प्रियजनांना त्रास देऊन पैसे कमविण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तो चुकीच्या आणि अनैतिक गोष्टी करू लागतो, तेव्हा लक्ष्मी रागावते आणि अशा व्यक्तीला सोडून निघून जाते.
advertisement
पैसा आल्यावर जे अहंकारी होतात, संपत्तीचा माज दाखवतात त्यांच्यावर माता लक्ष्मीचा कोप होतो. ही चूक श्रीमंतांनाही गरीब करते. अशा लोकांना लक्ष्मी शिक्षा देते. लक्ष्मीला स्वच्छता जास्त प्रिय आहे. म्हणूनच त्यांना अशा ठिकाणी राहणे आवडत नाही जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. लक्ष्मी असे स्थान सोडून निघून जाते.
advertisement
ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो, मोठ्यांचा आदर होत नाही त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. देवी लक्ष्मी अशा कुटुंबातील सदस्यांची प्रतिभा, क्षमता आणि आदर या सर्व गोष्टींचा नाश करते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Diwali 2023 : लक्ष्मीप्राप्तीसाठी फॉलो करा चाणक्याची ही नीती, का नष्ट होते मनुष्याची संपत्ती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement