Vastu Tips Water: वास्तुनुसार घरातील पाण्याची टाकी या दिशेला असावी; कुटुंबात राहते सुख-शांती
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi : घरातील पाण्याची जागा, टाकी किंवा पिण्याचे पाणी कोणत्या दिशेला ठेवल्यास घरात कोणतीही समस्या येत नाही. विरुद्ध दिशेला पाणी ठेवल्यास घरामध्ये धनहानी आणि रोग होतात. यासोबतच कुटुंबीयांच्या समस्याही वाढू लागतात, असे मानले जाते.
मुंबई, 08 फेब्रुवारी : घराची रचना वास्तुशास्त्रानुसार करण्याचा लोकांचा कल वाढला आहे. असं न केल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ लागतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. ज्योतिषशास्त्र, बृहतसंहिता या ग्रंथात जल, अग्नी, वायु, आकाश आणि पृथ्वी या घटकांसाठी वेगवेगळ्या दिशा सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही जल तत्वासाठी आहे. घरातील पाण्याची जागा, टाकी किंवा पिण्याचे पाणी या दिशेला ठेवल्यास घरात कोणतीही समस्या येत नाही. विरुद्ध दिशेला पाणी ठेवल्यास घरामध्ये धनहानी आणि रोग होतात. यासोबतच कुटुंबीयांच्या समस्याही वाढू लागतात, असे मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार पाणी ठेवण्याची योग्य जागा -
वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला पाण्याची टाकी ठेवणे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, या स्थितीत पाणी ठेवल्यानं चांगली संपत्ती मिळते. याशिवाय घरात प्रगती आणि समृद्धीही येते. उत्तर दिशेला पाण्याची टाकी किंवा पिण्याचे पाणी ठेवल्यास घरात सुख-शांती वाढते. पाण्याची टाकी उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांची आर्थिक स्थिती सुधारते. यासोबतच घरातील वातावरण शांत राहते.
advertisement
या दिशांना पाणी ठेवू नये -
वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, आग्नेय दिशा पाण्याची टाकी किंवा पाण्याचे ठिकाण बनवण्यासाठी अजिबात योग्य नाही. ही दिशा अग्नीची दिशा मानली जाते, अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घराच्या दक्षिण दिशेला पाण्याची टाकी किंवा भूमिगत टाकी नसावी. यामुळे कुटुंबात अस्वस्थता आणि अनपेक्षित नुकसान होते.
advertisement
- वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी नसावी. या ठिकाणी पाणी असल्याने घरातील लोकांना आजार होतात, तसेच कर्जही वाढते. अशा घरात राहणाऱ्या लोकांना मानसिक आजारही होऊ शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2024 2:20 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips Water: वास्तुनुसार घरातील पाण्याची टाकी या दिशेला असावी; कुटुंबात राहते सुख-शांती







