Vastu Tips: किचन मधील या मसाल्याच्या वापराने सर्व समस्या दूर होतील! आर्थिक लाभ होईल
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
Vastu Tips: ज्योतिषीय उपायांमध्ये काळी मिरी खूप महत्त्वाची मानली जाते. त्याचे उपाय लोकांना विशेष लाभ देतात. काळ्या मिरीचे उपाय आर्थिक लाभ देतात
ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती आणि दिशा प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करतात. ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सुचवले आहेत ज्याचा वापर करून ग्रहांना शांत करता येते. स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये काळी मिरी खूप प्रभावी मानली जाते. हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर याशी संबंधित ज्योतिषीय उपाय देखील विशेष फायदे देतात.
संपत्ती मिळविण्यासाठी, संकटांपासून मुक्त होण्यासाठी आणि नशीब मजबूत करण्यासाठी काळ्या मिरीच्या टिप्स खूप उपयुक्त आहेत. काळ्या मिरीशी संबंधित काही खास उपाय जाणून घेऊया.
काळ्या मिरचीची ही टीप आर्थिक लाभासाठी खूप गुणकारी आहे. 5 दाणे काळी मिरी घ्या आणि ते 7 वेळा आपल्या डोक्यावर फिरवा आणि चौरस्त्यावर किंवा निर्जन ठिकाणी उभे राहा आणि 4 दाणे चारही दिशांना फेकून द्या. काळी मिरीचा पाचवा दाणा आकाशाकडे फेकून द्या आणि मागे वळून न पाहता घरी परत या.
advertisement
शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ्या मिरीचा उपाय खूप उपयुक्त आहे. यासाठी काळी मिरी आणि 11 रुपये काळ्या कपड्यात बांधून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. काळ्या मिरीची ही युक्ती शनीच्या प्रभावापासून मुक्त होण्यास मदत करते.
Raksha Bandhan2024: रक्षाबंधनादिवशी भ्रदाकाल, राखी कधी आणि कशी बांधावी?
कामात वारंवार अडथळे येत असतील तर काळ्या मिरीचा हा उपाय करून पहा. घरातून बाहेर पडताना मुख्य दारात काळी मिरी ठेवावी. आता या काळ्या मिरीवरून बाहेर पडा. कोणत्याही कामासाठी तुम्ही प्रवासाला जाल, ते नक्कीच यशस्वी होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2024 7:48 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: किचन मधील या मसाल्याच्या वापराने सर्व समस्या दूर होतील! आर्थिक लाभ होईल