Vastu Tips: घरात हवी सुख आणि समृद्धी, याठिकाणी ठेवा क्रिस्टल, नक्कीच होणार लाभ, Video

Last Updated:

तुमच्या घरात सुख, समृद्धी, सकारात्मकता यावी आणि आपल्या परिवाराचे यश प्राप्तीकडे पाऊल जावेत, याकरता घरात काही क्रिस्टल ठेवणे गरजेचे असतात.

+
तुम्हालाही

तुम्हालाही वाटते घरात सुख समृद्धी नांदवी करा हे उपाय.

नाशिक: सगळीकडेच दिवाळीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बरेच लोक दिवाळीसाठी घरात साफसफाई करत असतात, रंगरंगोटी करत असतात, नवीन सामान घरात आणत असतात. यामुळे आपले घर फक्त सुशोभनिय दिसते. परंतु तुमच्या घरात सुख, समृद्धी, सकारात्मकता यावी आणि आपल्या परिवाराचे यश प्राप्तीकडे पाऊल जावेत, याकरता घरात काही क्रिस्टल ठेवणे गरजेचे असतात. याकरता आपण अधिक माहिती नाशिक येथील अंक्षशास्त्र तज्ज्ञ विभा घावरे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
सर्वांना वाटते आपल्या घरात सुख, समृद्धी असावी, घरात सकारात्मकता यावी. घरातील वातावरण आनंदित असावे, याकरता बरेच लोक विविध उपाय करत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? आपल्या घरात आणि घरातील काही भागात क्रिस्टल योग्य पद्धतीने ठेवल्यास आपल्याला नक्कीच याचा लाभ होणार आहे.
advertisement
कोणते क्रिस्टल कुठे ठेवावेत?
 ब्लॅक कार्मोनाइड- हा क्रिस्टल आपल्या घरातील मुख्य हॉलमध्ये ठेवू शकतात. यामुळे तुमच्या घरातील कोणतीही प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
 रोज कोट्स - हा क्रिस्टल तुम्हाला तुमचे कोणतेही नातेसंबंध टिकवण्यासाठी मदत करतो. प्रेमसंबंध घट्ट, नवरा-बायकोमधील वाद हा क्रिस्टल मिटवण्यास नक्कीच मदत करतो. हा क्रिस्टल आपल्या बेडरूममध्ये आपण ठेवू शकतो.
advertisement
क्लियर कॉड, अमेथीस आणि टाइगराईट हे क्रिस्टल आपण आपल्या मुलांच्या बेडरूममध्ये किंवा त्यांच्या अभ्यासाच्या जागेवर ठेवल्यास त्यांची एकाग्रता वाढवण्यास तसेच अभ्यासात मन लागण्यास, परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी मदत मिळत असते.
हे क्रिस्टल कधीही एकटे ठेवले जात नसतात, याकरता त्यांच्यासोबत क्लीयर कॉड हे क्रिस्टल ठेवावेत, ज्याची मदत आपल्या जवळील असलेल्या क्रिस्टलला ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते.
advertisement
हे सर्व क्रिस्टल सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरले किंवा वापर करण्यास सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला याचा लाभ हा होणार असल्याचे विभा घावरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu Tips: घरात हवी सुख आणि समृद्धी, याठिकाणी ठेवा क्रिस्टल, नक्कीच होणार लाभ, Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement