Ram Mandir: 'अयोध्या' या शब्दाचा अर्थ काय होतो? इतिहासातले दाखले काय सांगतात, जाणून घ्या
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Ram Mandir: गेल्या कित्येक दशकांपासून ज्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे तो क्षण लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येचा इतिहास काय आहे याची माहिती जाणून घेऊ या. अयोध्या विविध कालखंडातून गेली आहे. अयोध्येचा इतिहास काय आहे? या शब्दाचा अर्थ काय आहे, हे जाणून घेऊ या.
मेरठ, 30 डिसेंबर : अयोध्येत विकासाचं नवे पर्व सुरू होणार आहे. 30 डिसेंबर 2023 ही तारीख अयोध्येच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत 15 हजार 700 कोटी रुपयांच्या 46 प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. अयोध्या धाम जंक्शन इथून सहा वंदे भारत एक्स्प्रेस आणि दोन अमृत भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला जाईल. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करून जनसभेला संबोधित करणार आहेत.
सध्या संपूर्ण देश अयोध्यामय झाला आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. प्रत्येकाच्या मनात उत्साह आहे. ज्या काळात अयोध्येत भव्य राम मंदिर उभारलं गेलं, अशा काळात श्वास घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं ही फार मोठी गोष्ट आहे, अशी तरुणांची प्रातिनिधिक भावना आहे. 22 जानेवारीला मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहे. गेल्या कित्येक दशकांपासून ज्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे तो क्षण लवकरच येणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येचा इतिहास काय आहे याची माहिती जाणून घेऊ या. अयोध्या विविध कालखंडातून गेली आहे. अयोध्येचा इतिहास काय आहे? या शब्दाचा अर्थ काय आहे, हे जाणून घेऊ या.
advertisement
1733-40 या काळात अलीवर्दी खान हा बिहारचा नायब नझीम (सहाय्यक सुभेदार) होता. पुढे 1740पासून 1756पर्यंत त्याने बंगालचा नवाब म्हणून कारभार बघितला. नवाब सिराज-उद-दौला हा अलीवर्दी खानाचा नातू होता. खान याचं आपल्या या नातवावर विशेष प्रेम होतं. 1756मध्ये अलीवर्दी खानच्या मृत्यूनंतर सिराज-उद-दौला बंगालचा नवाब झाला.
advertisement
अलीवर्दी खानची राजवट अयोध्येपर्यंत कशी पोहोचली? अयोध्येचं नाव बदलून फैजाबाद करण्यामागे काय कारण होतं? नवाबांच्या काळात फैजाबाद कसं होत? याचा इतिहासात कशा प्रकारे उल्लेख आहे? अयोध्या हे धर्म, संस्कृती आणि अध्यात्माचं शहर का मानलं जातं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी न्यूज 18 ने इतिहासकारांशी विशेष चर्चा केली.
न्यूज 18 शी बोलताना इतिहासकार डॉ. अर्चना सिंह म्हणाल्या, की अलीवर्दी खान बंगालचा नवाब होता. त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्याची राजवट अवधपर्यंत (अयोध्या) वाढली होती. पुढे त्याचा उत्तराधिकारी शिजाउद्दौला आणि दरबारी फैज बक्श यांनी अयोध्येला नवाबाची राजधानी करण्यात मोठी भूमिका बजावली. फैज बक्शने नवाबांच्या काळात राजेशाही पद्धतीने विस्तार केला होता.
advertisement
इतिहासकार डॉ. अर्चना सिंह यांनी असंही सांगितलं, की इक्ष्वाकु राजांच्या काळात अयोध्या हे जगातल्या प्रमुख शहरांमध्ये गणलं गेलेलं ठिकाण होतं.
अयोध्येच्या इतिहासाबद्दल बोलताना इतिहासकार डॉ. अमित पाठक म्हणाले की, श्रीरामचंद्राव्यतिरिक्त भगवान बुद्धही अयोध्येत राहिलेले आहेत. भगवान महावीरसुद्धा अयोध्येत राहिले होते. पाच तीर्थंकरांचाही जन्म अयोध्येत झालेला आहे. ते पुढे म्हणाले, की अयोध्येच्या शेजारी फैजाबादची स्थापना झाली होती आणि ते दीर्घ काळ सत्तेचं केंद्र होतं. 'अवध' या शब्दाची उत्पत्तीही अयोध्येतून झाली, असं डॉ. पाठक याचं म्हणणं आहे. अयोध्येचा शब्दश: अर्थ सांगताना इतिहासकार म्हणतात, की युद्धाने जिंकता न येणारं ठिकाण म्हणजे अयोध्या. 'अ युद्ध' असाही अयोध्येचा अर्थ होतो. अ युद्ध म्हणजे असं ठिकाण जिथे युद्धच होत नाही आणि नेहमीच शांतता असते. अयोध्या हे भारतीय समाजाच्या पुनर्जागरणाचं केंद्र असल्याचं ते म्हणतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2023 11:23 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ram Mandir: 'अयोध्या' या शब्दाचा अर्थ काय होतो? इतिहासातले दाखले काय सांगतात, जाणून घ्या


