Shravan Month 2025: श्रावणात पत्रिकेत चंद्र खराब असेल तर काय करायचं? हे उपाय ठरतील फायदेशीर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
व्यक्तीच्या पत्रिकेत जर सगळे ग्रह चांगले असतील आणि चंद्र जर खराब असेल तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असे ज्योतिष अभ्यासक सांगतात.
ठाणे: व्यक्तीच्या पत्रिकेत जर सगळे ग्रह चांगले असतील आणि चंद्र जर खराब असेल तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असे ज्योतिष अभ्यासक सांगतात. त्यामुळे विविध समस्यांना समोर जावे लागते. श्रावणात चंद्र खराब असणाऱ्यांनी काय उपाय करावेत? याविषयीची माहिती वेदमूर्ती कुलदीप जोशी यांनी दिली आहे.
व्यक्तीच्या पत्रिकेतील चंद्र हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. चंद्र जर खराब असेल तर मनुष्याला मनःशांती मिळत नाही. मन स्थिर नसल्यामुळे या माणसांना आर्थिक अडचणीचा देखील सामना करावा लागतो. जर तुमचा चंद्र मजबूत नसेल तर या श्रावणात तुम्ही काय उपाय केला पाहिजे. याविषयी मार्गदर्शन करताना कुलदीप जोशी सांगतात की, श्रावणात भगवान शंकरांच्या दर्शनाचे काही विशेष नियम नसले तरीदेखील जर तुमचा चंद्र खराब असेल तर तुम्ही पांढराशुभ्र कपडे परिधान करावे. सकाळी योग्य पद्धतीने स्नान करून भगवान शंकरांचे दर्शन करावे.
advertisement
हा विषय अधिक माहिती देत ते पुढे सांगतात की, या महिन्यामध्ये भगवान शंकरांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजा केल्या जातात. यात रुद्राभिषेक देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्या लोकांना सोळा सोमवारचा व्रत करायचं असेल त्यांनी या श्रावणी सोमवारपासून सुरू केलं तर ते अधिक फलदायी ठरेल असं देखील ते सांगतात. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भगवान शंकराची उपासना या श्रावण महिन्यामध्ये करू शकता.
advertisement
भगवान शंकराची उपासना कशी कराल?
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची तुम्ही मनोभावे पूजा करू शकता. परंपरेनुसार शंकराच्या पिंडीवर मूठभर धान्य अर्पण केल्यास घरामध्ये सुख, शांतता, समृद्धी नांदते आणि जीवनातील रोगराई-अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती जोतिष्य शास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
July 31, 2025 4:12 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan Month 2025: श्रावणात पत्रिकेत चंद्र खराब असेल तर काय करायचं? हे उपाय ठरतील फायदेशीर

