Religious: पूजा-विधींमध्ये या 4 रंगांचाच का करतात वापर? रंगाची खासियत, काय आहे धार्मिक महत्त्व
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Religious : सनातन हिंदू धर्मात या चार रंगांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे, त्यात पिवळा, लाल, पांढरा आणि हिरवा यांचा समावेश आहे.
मुंबई : आपण अनेकदा पाहिलं असेल की पूजेदरम्यान प्रामुख्याने चार रंगांचा वापर केला जातो. सनातन हिंदू धर्मात या चार रंगांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे, त्यात पिवळा, लाल, पांढरा आणि हिरवा यांचा समावेश आहे. देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो, भगवान विष्णूला पिवळा रंग आवडतो. आजच्या लेखात आपण ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून या चार रंगांची खासियत आणि महत्त्व जाणून घेणार आहोत.
1. लाल रंगाचा वापर - ज्योतिषशास्त्रानुसार, हिंदू धर्मात पूजेदरम्यान लाल रंगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. हा रंग धैर्य, उत्साह, सौभाग्य आणि शुभाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे पूजेच्या वेळी सर्व देवी-देवतांना लाल टिळा लावला जातो. धार्मिक ग्रंथांमध्ये लाल रंग हा देवी दुर्गा आणि लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो. असे मानले जाते की, पूजेच्या वेळी लाल रंगाचे कापड पसरून त्यावर पूजा मांडल्यास भाग्य उजळते.
advertisement
2. पांढऱ्या रंगाचे महत्त्व - सनातन धर्मात पांढरा रंग हा चंद्र, शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. यामुळेच पूजेत पांढरा रंग जितका जास्त वापरला जाईल तितकी तुमची पूजा सुरळीत आणि शांततेने पूर्ण होते. याशिवाय पांढरा रंग भगवान शंकरालाही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्यास त्याचा विशेष लाभ होतो.
advertisement
3. पिवळ्या रंगाचे महत्त्व - सनातन धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा होत असेल तर या काळात पिवळा रंग वापरणे खूप शुभ मानले जाते. भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो. पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. याच कारणामुळे पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कापड पसरवणे देखील शुभ मानले जाते.
advertisement
4. हिरव्या रंगाचे महत्त्व - हिंदू धर्मात पूजेच्या वेळी हिरवा रंग देखील वापरला जातो. तो निसर्ग आणि आयुर्वेदाचे सूचक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे, पूजेमध्ये हिरव्या रंगाचा वापर केल्यास व्यक्तीला आरोग्य लाभ होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 09, 2024 9:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Religious: पूजा-विधींमध्ये या 4 रंगांचाच का करतात वापर? रंगाची खासियत, काय आहे धार्मिक महत्त्व


