पितृ पक्षात कावळ्यालाच का दिलं जातं अन्न? इतर पक्षांना का नाही, नेमका काय आहे संबंध?
- Published by:News Digital
- trending desk
Last Updated:
पितृपक्षाच्या काळात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पितरांसाठी कावळ्यांना अन्नदान केलं जातं. या काळात कावळ्यांना अन्न खाऊ घालण्याचं विशेष महत्त्व असतं.
मुंबई, 26 सप्टेंबर : येत्या 29 सप्टेंबर 2023 शुक्रवारपासून पितृपक्ष सुरू होत आहे. धार्मिक मान्यतांनुसार, या काळात आपले मृत पूर्वज आपल्यासोबत पृथ्वीवर 15 दिवस घालवण्यासाठी येतात. या काळात त्यांचे तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केलं जातं, ज्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला समृद्धी आणि सुखाचा आशीर्वाद देतात. पितृपक्षाच्या काळात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की पितरांसाठी कावळ्यांना अन्नदान केलं जातं. या काळात कावळ्यांना अन्न खाऊ घालण्याचं विशेष महत्त्व असतं. कावळ्यांना अन्न का खायला दिलं जातं, हे आपण भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
हे पूर्वजांचं प्रतीक मानतात
पितृपक्षात कावळ्याने अन्न खाणं हे विशेष महत्त्वाचं असल्याचंही सांगितलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार कावळा यमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या काळात कावळ्यांची उपस्थिती हे पूर्वज आजूबाजूला असण्याचं लक्षण मानतात. पितृपक्षात संपूर्ण 15 दिवस कावळ्यांना अन्न खायला द्यावे, असे मानले जाते.
कावळा सापडला नाही तर काय करावं?
पितृपक्षात कावळा अन्न खाण्यास सापडला नाही तर गाय किंवा कुत्र्याला जेवण द्यावं, असं म्हटलं जातं. या काळात पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पिंपळाचं झाड हे पूर्वजांचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे पितृपक्षात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे या महिन्यात श्राद्ध घालताना पिंपळाची पूजाही केली जाते.
advertisement
कावळा मेल्यानंतर कावळ्याचे सोबती काय करतात?
धार्मिक मान्यतेनुसार, कावळा कधीही स्वत:ला मारत नाही किंवा कोणत्याही आजाराने मरत नाही. उलट कावळे अचानक मरतात. कळपातील कोणताही कावळा ज्या दिवशी मेला, त्या दिवशी त्याचे इतर कावळे अन्न खात नाहीत.
पितृपक्षात श्राद्ध का घालतात?
view commentsहिंदूधर्मात श्राद्ध हे मृत वडिलधाऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलं जातं. हिंदू धर्मग्रंथांमध्ये वडिलांचे ऋण सर्वात मोठं आणि महत्त्वाचं मानतात. वडिलोपार्जित ऋणाव्यतिरिक्त हिंदू धर्मात देव आणि ऋषी ऋणंदेखील आहेत, परंतु वडिलोपार्जित ऋृण हे सर्वात मोठं ऋण आहे. श्राद्ध घालण्याची सर्व कामे करताना विशेष नियम पाळले जातात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2023 12:35 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
पितृ पक्षात कावळ्यालाच का दिलं जातं अन्न? इतर पक्षांना का नाही, नेमका काय आहे संबंध?


