शेवटची पोळी कुत्र्याला खायला द्यावी! त्यामागचं नेमकं कारणं काय? ज्योतिष सांगतात...

Last Updated:

हिंदू धर्मात कुत्र्याला शेवटची पोळी देण्याची परंपरा धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. कुत्र्याला यमराजाचा संदेशवाहक समजले जाते आणि त्याला पोळी दिल्याने पुण्य मिळते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि...

News18
News18
भारतात अन्नाला केवळ पोट भरण्यापुरतं महत्त्व नाही. ते आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, जो धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वासांशी जोडलेला आहे. विशेषत: हिंदू धर्मात, अन्नाला देव-देवतांचा आशीर्वाद मानलं जातं आणि त्याचा आदर करणं महत्त्वाचं मानलं जातं. "शेवटची पोळी कुत्र्याला द्यावी" असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण यामागचं कारण काय असेल, याचा कधी विचार केलाय का? भोपाळचे ज्योतिषाचार्य पंडित योगेश चौरे यांच्याकडून याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
धार्मिक श्रद्धा : हिंदू धर्मात कुत्र्याला यमराजाचा दूत मानलं जातं. यमराज हे मृत्यूचे देव आहेत आणि कुत्रा त्यांच्याशी संबंधित आहे, असं मानलं जातं. या धार्मिक दृष्टिकोनानुसार, शेवटची पोळी कुत्र्याला दिल्याने पुण्य मिळतं आणि जीवनात सुख-शांती नांदते. कुत्र्याला अन्न दिल्याने शुद्धता आणि आशीर्वाद मिळतात, असा विश्वास प्राचीन काळापासून प्रचलित आहे. यमराजाच्या दूताला पोळी दिल्याने मृत्यूची भीती कमी होते आणि जीवनात संतुलन राखलं जातं, असं मानलं जातं.
advertisement
करुणा आणि सेवा : कुत्रे नेहमीच निष्ठा आणि प्रेमाचं प्रतीक राहिले आहेत. ते आपल्या मालकाप्रती निष्ठा आणि विश्वास दर्शवतात. जेव्हा आपण आपल्या जेवणातील शेवटची पोळी कुत्र्याला देतो, तेव्हा ती त्यांच्याप्रती आपली करुणा आणि सेवेचं प्रतीक बनते. ही केवळ चांगली प्रथा नाही, तर आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांप्रती सहानुभूती आणि आदर करण्याचा  मेसेजही आपल्याला देते. असं केल्याने आपण आपली माणुसकी अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करतो.
advertisement
वाईट शक्तींपासून संरक्षण : अनेक धार्मिक विश्वासांनुसार, कुत्र्याला अन्न दिल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो. कुत्र्याला अन्न दिल्याने घरातील कोणतीही वाईट ऊर्जा किंवा नकारात्मकता दूर होते. विशेषत: शनिवारी आणि अमावस्येला कुत्र्यांना पोळी आणि गूळ दिल्याने शनि दोष आणि पितृ दोष संपतो, असं मानलं जातं. या दिवशी कुत्र्यांना अन्न दिल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांती टिकून राहते.
advertisement
आरोग्य फायदे आणि स्वच्छता : कुत्र्यांना अन्न दिल्याने आपल्या घरात स्वच्छता आणि चांगलं आरोग्य येतं. अनेकांचा असा विश्वास आहे की, कुत्र्यांसोबत अन्न वाटून खाल्ल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा येते. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर मानसिक शांतीसाठीही एक चांगलं पाऊल आहे. कुत्र्याची निष्ठा आणि उपस्थिती घरात आनंद आणि समृद्धी आणते.
शेवटची पोळी कशी द्यावी? : अनेकदा लोकांना शेवटची पोळी कुत्र्याला कशी आणि कधी द्यावी हे समजत नाही. याबद्दल जाणून घेऊया.
advertisement
  • पोळीमध्ये मीठ आणि तेल नसावं, कारण ते कुत्र्याच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
  • कुत्र्याला दिवसा पोळी देणं चांगलं, कारण त्यांना रात्री शांतपणे विश्रांती घेणं आवश्यक असतं.
  • शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी दिली तर ती शुभ मानली जाते आणि त्यामुळे शनि दोष दूर होण्यास मदत होते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
शेवटची पोळी कुत्र्याला खायला द्यावी! त्यामागचं नेमकं कारणं काय? ज्योतिष सांगतात...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement