तुम्ही भविष्यात श्रीमंत होणार का? हे सांगते तुमची जन्मकुंडली! जाणून घ्या सविस्तर
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
जर कुंडलीच्या मध्यभागी कोणताही ग्रह नसेल तर अशी कुंडली शुभ मानली जात नाही. अशी व्यक्ती नेहमी ऋणात असते. कुंडलीच्या मध्यभागी हा ग्रह असल्यामुळे काय साध्य होते ते जाणून घेऊया.
आपली जन्मकुंडली ही खूप महत्वाची मनाली जाते त्यात भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही त्यात सामावलेले आहेत. 12 घरांच्या कुंडलीत पहिले, चौथे, सातवे आणि दहावे घर मध्यवर्ती गृह मानले जाते. जर कुंडलीच्या मध्यभागी कोणताही ग्रह नसेल तर अशी कुंडली शुभ मानली जात नाही. अशी व्यक्ती नेहमी ऋणात असते. कुंडलीच्या मध्यभागी हा ग्रह असल्यामुळे काय साध्य होते ते जाणून घेऊया.
1. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या मध्यभागी मंगळ असेल तर तो सैन्यात नोकरी करतो.
2. जर कुंडलीच्या मध्यभागी सूर्य देव असेल तर अशी व्यक्ती राजाची सेवक बनते.
3. कुंडलीच्या मध्यभागी चंद्र देव असताना व्यक्ती व्यापारी बनते.
4. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीच्या मध्यभागी बुध असेल तर तो गुरू असतो.
5. जर कुंडलीच्या मध्यभागी गुरु ग्रह ठेवला असेल तर ती व्यक्ती ज्ञानी असते आणि मोठ्या क्षेत्रात काम करते.
advertisement
6. ज्योतिष शास्त्रानुसार, केंद्रात शुक्राची उपस्थिती व्यक्तीला श्रीमंत आणि ज्ञानी बनवते. त्यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही.
vastu tips: पैशांच्या तंगीपासून सुटकेसाठी या मसाल्याचा उपाय खूप फायदेशीर ठरेल!
7. कुंडलीच्या मध्यभागी शनि असल्यामुळे ती व्यक्ती वाईट लोकांची सेवा करणारा बनतो.
8. ज्योतिषांच्या मते, कुंडलीच्या मध्यभागी उच्चस्थानी सूर्य आणि केंद्राच्या चौथ्या घरात गुरूचे स्थान असेल, तर व्यक्तीला सुख-सुविधांचा लाभ होतो.
advertisement
9. जर कुंडलीच्या मध्यभागी कोणताही ग्रह नसेल तर तो अशुभ मानला जातो. अशी व्यक्ती कर्जामुळे नेहमी त्रस्त असते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2024 12:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
तुम्ही भविष्यात श्रीमंत होणार का? हे सांगते तुमची जन्मकुंडली! जाणून घ्या सविस्तर


