BCCI राष्ट्रीय हितापेक्षा मोठं आहे का? IND vs PAK मॅचवरून आदित्य ठाकरेंचं क्रिडामंत्र्यांना पत्र, म्हणाले...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Aaditya Thackeray Pens to Mansukh Mandaviya : रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, पण बीसीसीआयसाठी रक्त आणि महसूल एकत्र वाहत आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
India vs Pakistan Match Controversy : आशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची (Asia Cup Squad Team India) घोषणा केली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया येत्या 14 तारखेला पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. अशातच आता भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, यासाठी उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी थेट क्रिडामंत्र्यांना पत्र लिहित टीका केली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, पण बीसीसीआयसाठी रक्त आणि महसूल एकत्र वाहत आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. मी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाठी संघ पाठवण्याच्या लज्जास्पद कृत्यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
advertisement
Blood and Water cannot flow together, but for @BCCI blood and revenue can flow together.
I have written to Union Minister Shri Mansukh Mandaviya ji, asking for the Union Government’s intervention in BCCI shameful act of sending a team that will play cricket with pakistan.
The… pic.twitter.com/PysIuPtmJL
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 20, 2025
advertisement
पत्रात काय काय लिहिलंय?
पत्रात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ या विधानाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे आपल्या देशाला आणि नागरिकांना वेळोवेळी धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि जाहिरातींच्या महसुलासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे.
advertisement
बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा मोठं आहे का?
आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, "बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा मोठा आहे का? आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा तो मोठा आहे का?" त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याचा उल्लेख करत, त्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या बलिदानाला बीसीसीआयने दुर्लक्षित केल्याचे म्हटले आहे. दहशतवाद हा असा मुद्दा आहे, ज्यामुळे दोन्ही देशांची शांतता धोक्यात येते, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
पाकिस्तानची दुटप्पी भूमिका
आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले. हॉकी खेळण्यासाठी पाकिस्तानने भारतात येण्यास सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला होता, तरीही बीसीसीआय स्वार्थासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रातून आदित्य ठाकरे यांनी क्रीडामंत्र्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI राष्ट्रीय हितापेक्षा मोठं आहे का? IND vs PAK मॅचवरून आदित्य ठाकरेंचं क्रिडामंत्र्यांना पत्र, म्हणाले...