कुणालाही जमलं नाही, ते नशिबाने केलं! मॅचसाठी बहिणीचं लग्न सोडलं, त्याच सामन्यात अभिषेक शून्यवर आऊट!

Last Updated:

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन बॅटर असलेला अभिषेक शर्मा आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा प्रमुख हिरो ठरला.

कुणालाही जमलं नाही, ते नशिबाने केलं! मॅचसाठी बहिणीचं लग्न सोडलं, त्याच सामन्यात अभिषेक शून्यवर आऊट!
कुणालाही जमलं नाही, ते नशिबाने केलं! मॅचसाठी बहिणीचं लग्न सोडलं, त्याच सामन्यात अभिषेक शून्यवर आऊट!
कानपूर : आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नंबर वन बॅटर असलेला अभिषेक शर्मा आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा प्रमुख हिरो ठरला. पण ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये अभिषेक शर्माची बॅट शांत राहिली. या सामन्यात अभिषेक शर्मा शून्य रनवर आऊट झाला आहे. याच मॅचमुळे अभिषेक शर्मा आज अमृतसरमध्ये त्याच्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नाला जाऊ शकला नाही.
आशिया कप 2025 मध्ये धमाका करणाऱ्या अभिषेक शर्माकडून चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या, पण 50 ओव्हरच्या या मॅचमध्ये अभिषेक अपयशी ठरला. जॅक एडवर्ड्सच्या बॉलिंगवर सदरलँडने 1.1 ओव्हरमध्ये अभिषेक शर्माचा कॅच पकडला.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारत ए चा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. अभिषेकनंतर भारताचा दुसरा ओपनर प्रभसिमरन सिंगही फार चांगली कामगिरी करू शकला नाही. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर सदरलँडने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. 10 बॉलमध्ये 1 रन करून प्रभसिमरन आऊट झाला.
advertisement
भारत ए चा कर्णधार श्रेयस अय्यर यानंतर बॅटिंगला उतरला, पण तोदेखील फ्लॉप गेला. सीरिजच्या पहिल्या सामन्यात अय्यरने 83 बॉलमध्ये 110 रन केले होते. पण या सामन्यात अय्यर सहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जॅक एडवर्ड्सच्या बॉलिंगवर बोल्ड झाला. आशिया कप 2025 च्या टीममध्ये असलेले तिलक वर्मा, हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंग या सामन्यात खेळत आहेत.
advertisement

भारत ए टीम

अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेट कीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, हर्षीत राणा, युद्धवीर सिंग चरक, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग

ऑस्ट्रेलिया ए टीम

मॅकेन्झी हार्वे, जेक फ्रेजर-मॅकगर्क (विकेट कीपर), लॅचलन हर्न, कूपर कोनली, जॅक एडवर्ड्स (कर्णधार), लॅचलन शॉ, हॅरी डिक्सन, लियाम स्कॉट, विल सदरलँड, सॅम एलियट, तनवीर संघा
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
कुणालाही जमलं नाही, ते नशिबाने केलं! मॅचसाठी बहिणीचं लग्न सोडलं, त्याच सामन्यात अभिषेक शून्यवर आऊट!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement