advertisement

पुजारा-रहाणेच्या करिअरचा The End, एका निर्णयाने कमबॅकची शेवटची आशाही मावळली!

Last Updated:

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा भारताच्या ऐतिहासिक टेस्ट विजयांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या या दोन्ही दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले का?

पुजारा-रहाणेच्या करिअरचा The End, एका निर्णयाने कमबॅकची शेवटची आशाही मावळली!
पुजारा-रहाणेच्या करिअरचा The End, एका निर्णयाने कमबॅकची शेवटची आशाही मावळली!
मुंबई : अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा भारताच्या ऐतिहासिक टेस्ट विजयांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या या दोन्ही दिग्गजांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले का? हा प्रश्न निर्माण व्हायचं कारण म्हणजे दुलीप ट्रॉफीसाठी निवड झालेली टीम. 28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी रहाणे आणि पुजाराची वेस्ट झोनसाठीच्या टीममध्ये निवड झालेली नाही. भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्याची आशा असलेल्या रहाणे आणि पुजारासाठी हा धक्का आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी वेस्ट झोनच्या टीममध्ये स्थान मिळवण्यासाठीची स्पर्धा तीव्र होती. 'आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. रहाणे पुजाराला टीममध्ये स्थान मिळवणे सोपे नव्हते. सरफराज आणि श्रेयससारखे खेळाडू असल्यामुळे स्पर्धा खूपच कठीण झाली आहे', असं एका निवड समिती सदस्याने सांगितलं आहे.

रहाणेची निराशाजनक रणजी कामगिरी

2023-24 च्या हंगामात मुंबईला 42 व्या रणजी ट्रॉफी जेतेपदापर्यंत नेण्यात रहाणेने कर्णधार म्हणून भूमिका बजावली होती, पण त्याची स्वतःची कामगिरी खूपच निराशाजनक होती. 8 सामन्यांमध्ये तो दोन अर्धशतकांसह 17.83 च्या सरासरीने फक्त 214 रन करू शकला. 2024-25 च्या रणजी हंगामात त्याने 9 सामन्यांमध्ये 35.92 च्या सरासरीने 467 रन केल्या आणि एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.
advertisement
चेतेश्वर पुजाराने 2024-25 च्या रणजी हंगामात सौराष्ट्रसाठी चांगली कामगिरी केली. त्याने 7 सामन्यांमध्ये 40.20 च्या सरासरीने एकूण 402 रन केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश होता, पण त्याची कामगिरी निवड समितीला प्रभावित करू शकली नाही. पुजाराने अलिकडेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये कॉमेंट्री केली, ज्यावरून पुजारा हळूहळू मैदानापासून दूर जात असल्याचं चित्र आहे.
advertisement

दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोनची टीम

शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्य देसाई, हार्विक देसाई, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले, शम्स मुलानी, तनुश कोटियान, धर्मेंद्रसिंह जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नगवासवाला
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पुजारा-रहाणेच्या करिअरचा The End, एका निर्णयाने कमबॅकची शेवटची आशाही मावळली!
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement