VIDEO : मानलं रहाणेला! 36 वर्षाच्या अजिंक्यने भयानक झेल घेतला,अख्खं स्टेडिअम उभं राहुन पाहत राहिलं

Last Updated:

कोलकत्ताने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सुर्यवंशी जोडी मैदानात उतरली होती.

ajinkya rahane takes brilliant catch
ajinkya rahane takes brilliant catch
Ajinkya Rahane Takes Vaibhav suryavanshi catch : आयपीएलच्या 18 व्या हंगामात आज कोलकत्ता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 206 धावा केल्या आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससमोर 207 धावांचे आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने खराब सूरूवात झाली आहे. यावेळी सामन्याच्या सुरूवातीला अजिंक्य रहाणेने भन्नाट झेल घेतला आहे. हा कॅच पाहून अख्ख स्टेडिअम त्याच्याकडे बघत राहिलं. या कॅचचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
कोलकत्ताने दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सुर्यवंशी जोडी मैदानात उतरली होती. यावेळी पुन्हा एकदा वैभव सुर्यवंशी आपल्या फलंदाजीची चुणुक दाखवेल अशी अपेक्षा होती. मात्र वैभव अवघ्या 4 धावांवर बाद झाला.
advertisement
वैभव अरोराने टाकलेल्या बॉलवर सुर्यवंशीने उंचावर बॉल टाकला होता. यावेळी अजिंक्य रहाणेने बाऊंड्री लाईनवर उटला पळत जात भन्नाट झेल घेतला आहे.खरं तर उलटा पळत जाऊन झेल घेण तितकंस सोप्प नसतं. पण अजिंक्य रहाणेने ते चांगल्या प्रकारे करून दाखवलं आणि भन्नाट झेल घेतला. विशेष म्हणजे ही कॅच घेतल्यानंतर अजिंक्य रहाणे अग्रेशन दाखवत भन्नाट सेलीब्रेशन केलं.
advertisement

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):

यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) :

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : मानलं रहाणेला! 36 वर्षाच्या अजिंक्यने भयानक झेल घेतला,अख्खं स्टेडिअम उभं राहुन पाहत राहिलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement