Arjun Tendulkar : अर्जुनला बेक्कार धुतलं, एकट्याने दिले 145 रन... सचिनच्या पोराला तारे दाखवणारा जय गोहिल कोण आहे?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
रणजी ट्रॉफी 2025-26 च्या मोसमात सध्या पाचव्या राऊंडचे सामने सुरू आहेत. सौराष्ट्र आणि गोवा यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात सौराष्ट्रने दमदार सुरूवात केली आहे.
मुंबई : रणजी ट्रॉफी 2025-26 च्या मोसमात सध्या पाचव्या राऊंडचे सामने सुरू आहेत. सौराष्ट्र आणि गोवा यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात सौराष्ट्रने दमदार सुरूवात केली आहे. सौराष्ट्रने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर सौराष्ट्रने 7 विकेट गमावून 585 रन केल्या आणि इनिंग घोषित करण्याचा निर्णय घेतला. गोव्याच्या बॉलिंगमध्ये अर्जुन तेंडुलकरची कामगिरी निराशाजनक झाली. तो गोव्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रन देणारा बॉलर होता.
अर्जुन तेंडुलकरची निराशाजनक कामगिरी
या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने गोव्याच्या बॉलिंगचे नेतृत्व केले. त्याने नवीन बॉलने सुरुवात केली, पण तो फारसे काही करू शकला नाही. अर्जुन तेंडुलकरने 29 ओव्हर बॉलिंग टाकली आणि फक्त 1 विकेट घेतली, यात त्याने 5 च्या इकॉनॉमी रेटने 145 रन दिल्या. सौराष्ट्राचा युवा बॅटर जय गोहिलने अर्जुन तेंडुलकरविरुद्ध सर्वाधिक रन केल्या. जय गोहिलने अर्जुनच्या 24 बॉलचा सामना केला आणि 35 रन केल्या. या दरम्यान अर्जुन तेंडुलकरला 6 फोर आणि एक सिक्सही पडली.
advertisement
अर्जुन तेंडुलकर आणि जय गोहिल यांनी त्यांच्या रणजी कारकिर्दीची सुरुवात एकत्र केली आहे. दोन्ही खेळाडूंनी 2022 मध्ये त्यांचे पदार्पणाचे सामने खेळले. अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणात शतक झळकावले तर सौराष्ट्राचा बॅटर जय गोहिलने त्याच्या द्विशतकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने आसामविरुद्ध 246 बॉलमध्ये 227 रन केल्या आणि रणजी पदार्पणात द्विशतक झळकावणारा तो पहिला सौराष्ट्राचा खेळाडू ठरला.
advertisement
जय गोहिलची कारकीर्द
24 वर्षीय जय गोहिलने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी, 14 लिस्ट ए आणि 23 टी-२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांसह 650 हून अधिक रन केल्या आहेत. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 31.75 च्या सरासरीने 381 रन केल्या आहेत. त्याच्याकडे टी-20 मध्येही 319 रन आहेत. गोवा विरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 97 बॉलमध्ये 68 रनची शानदार खेळी केली, ज्यामध्ये 11 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 11:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : अर्जुनला बेक्कार धुतलं, एकट्याने दिले 145 रन... सचिनच्या पोराला तारे दाखवणारा जय गोहिल कोण आहे?


