170000000 रुपयांचा फटका, हेडची स्टंटबाजी अंगाशी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2 दिवसांमध्येच कंगाल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऍशेसच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 8 विकेटने पराभव केला, पण ट्रॅविस हेडच्या शतकामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.
पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या ऍशेस सीरिजचा रोमांच सुरू झाला आहे. सीरिजचा पहिला सामना पर्थमध्ये झाला, जो दोनच दिवसांमध्ये संपला. या सामन्यासाठी रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची खतरनाक बॉलिंग आणि चौथ्या इनिंगमध्ये ट्रॅविस हेडचं वादळी शतक, यामुळे दुसऱ्याच दिवशी या मॅचचा निकाल लागला.
ऑस्ट्रेलियाने ऍशेस सीरिजची पहिली मॅच 8 विकेटने जिंकली. चौथ्या इनिंगमध्ये ट्रॅविस हेडने 83 बॉलमध्ये 123 रनची खेळी केली, ज्यात 16 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. पण ट्रॅविस हेडच्या या खेळीमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं तब्बल 17.35 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. दोनच दिवसांमध्ये मॅच संपल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याचा मोठा फटका बसला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या दिवसाची तिकीटं आधीच विकली गेली होती, पण मॅचचा निकाल दोनच दिवसांमध्ये लागल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला प्रेक्षकांना रिफंड द्यावा लागला आहे.
advertisement
प्रेक्षकांची रेकॉर्ड ब्रेक हजेरी
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी प्रेक्षक संख्येची सगळी रेकॉर्ड तुटली. मॅचच्या पहिल्या दिवशी जवळपास 51,531 प्रेक्षक उपस्थित होते. तर दुसऱ्या दिवशी प्रेक्षक संख्या 49,983 एवढी होती. मॅचच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही तेवढ्याच प्रेक्षक संख्येची अपेक्षा होती, ज्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला तिकीट विक्रीतून मोठा नफा झाला असता, पण मिचेल स्टार्क आणि ट्रॅविस हेडच्या कामगिरीमुळे मॅचचा निकाल दोनच दिवसांमध्ये लागला.
advertisement
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या इनिंगमध्ये विजयासाठी 205 रनची गरज होती. पर्थची धोकादायक खेळपट्टी पाहता ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणं कठीण होईल, असं वाटत होतं. पण हेडच्या वादळी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना अगदी सहज जिंकला. हेडने फक्त 69 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं.
हेडने माफी मागितली
ट्रॅविस हेडने मॅच संपल्यानंतर चाहत्यांची माफीही मागितली, ज्यांनी रविवारसाठी तिकीट बूक केली होती. 'ज्यांना उद्या येता येणार नाही, त्यांचं मला वाईट वाटलं. मला वाटतं उद्या पूर्ण स्टेडियम भरलं असतं', असं हेड मॅच संपल्यानंतर सेव्हन नेटवर्कसोबत बोलताना म्हणाला.
advertisement
पहिल्या दिवशी 19 विकेट
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी 19 विकेट गेल्या होत्या. मिचेल स्टार्कने पहिल्या दिवशी 7 विकेट घेतल्या. तर सामन्यामध्ये 2 दिवसांमध्ये 32 विकेट गेल्या आणि मॅचचा निकाल फक्त 13 तासांमध्येच लागला, त्यामुळे या सामन्याची चर्चा जोरात झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
170000000 रुपयांचा फटका, हेडची स्टंटबाजी अंगाशी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया 2 दिवसांमध्येच कंगाल!


